शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

दापोलीत खवले मांजर तस्कराला अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 4:37 AM

दापोली : रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये खवले मांजराचे तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून दापोली ...

दापोली : रत्नागिरी व रायगड या दोन जिल्ह्यांमध्ये खवले मांजराचे तस्करी करणारे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता असून दापोली पोलिसांनी बळीराम नारायण उतेकर याला अटक केली आहे. खवले मांजर खवले तस्कर प्रकरणी या संशयिताला २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. उतेकर याचा साथीदार मात्र पळाला असून, दापोली व महाड पोलीस कसून शोध घेत आहेत.

दापोली शहरात खवले मांजराच्या खवल्यांची विक्री करण्याकरिता आलेल्या दोघांवर सापळा रचून दापोली पोलिसांनी कारवाई केली. या कारवाईत बळीराम उतेकर या संशयिताच्या मुसक्या आवळण्यात दापोली पोलिसांना यश आले. तुकाराम शिंदे हा संशयित मात्र पोलिसांच्या तावडीतून पळण्यात यशस्वी झाला.

दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास काही लोक खवले मांजराची खवले विक्रीकरिता दापोलीत येणार असल्याची माहिती दापोली पोलिसांना समजली होती. त्या माहितीनुसार दापोली पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हेड कॉन्स्टेबल संदीप गुजर, कॉन्स्टेबल सुशील मोहिते, गायकवाड या कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. खवले मांजराचे खवले विक्री करणारे दापोली शहरातील इंडियन पेट्रोल पंपासमोर चहाच्या टपरीमध्ये येऊन व्यवहार करणार असल्याची माहिती उपलब्ध झाली होती. त्यानुसार सापळा रचण्यात आला होता.

दुपारच्या सुमारास बळीराम उतेकर (वय ४२, रा. नागाव फौजदार वाडी, तालुका महाड, रायगड) व तुकाराम शिंदे (रा. नेरूळ नगर, खैरोली ता. रोहा, रायगड) हे आपल्या ताब्यातील युनिकॉन मोटार सायकल (एमएच ०६ बी आर ३४१८) ही गाडी घेऊन पेट्रोल पंपासमोर आले. त्यावेळेस पोलिसांनी त्यांच्यावर झडप घातली. तुकाराम शिंदे हा संशयित पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास यशस्वी ठरला.

रायगड व रत्नागिरी या दोन जिल्ह्यात गेली अनेक वर्ष खवले मांजर बचाव मोहीम मोठ्या प्रमाणात राबवली जात आहे. परंतु या दोन जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात खवले मांजराची तस्करी होत असून, यापूर्वी अनेक वेळा तस्करी करताना पकडण्यात वनविभाग व पोलिसांना यश आले आहे. तरीही तस्करी थांबली नसल्याचे निष्पन्न झाले आहे.

दापोली पोलिसांनी बळीराम उतेकरकडून ४.७०० किलो ग्रॅम वजनाचे खवले पोलिसांनी हस्तगत केले आहेत. वन्य जीव संरक्षण कायदा १९७२ चे कलम ३९, ४४, ४८, ५१ (१) प्रमाणे त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलीस स्थानकात प्रभारी पोलीस निरीक्षक म्हणून रुजू झाल्यानंतर नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पहिलीच धडक कारवाई झाल्याने त्यांच्या कार्यपद्धतीचे सर्वत्र कौतुक होत आहे. बळीराम उतेकर याला न्यायालयाने २४ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणाचा अधिक तपास दापोलीचे पोलीस उपनिरीक्षक विलास पड्याळ करीत आहेत.