रत्नागिरी : रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण संघातर्फे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कऱ्हाडे ब्राह्मण ज्ञातीतील होतकरू आठवीपासून पुढील शिक्षण घेणाºऱ् विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती स्वरुपात आर्थिक मदत दिली जाणार आहे. अधिक माहितीसाठी रत्नाागिरी कऱ्हाडे ब्राह्कण संघ, शेरेनाका, झाडगाव येथे ३१ ऑगस्टपर्यंत संपर्क करावा.
शेतकऱ्यांना मार्गदर्शन
लांजा : तालुका कृषी विभागातर्फे कृषी संजीवनी उपक्रमांतर्गत तालुक्यातील झापडे गावातील शेतकऱ्यांना शेतीविषयक मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला पंचायत समितीच्या माजी सभापती लीला घडशी, तालुका कृषी अधिकारी अंकुश धोंडे, पर्यवेक्षक भालचंद्र कांबळे आदी उपस्थित होते.
सेवानिवृत्तीपर सत्कार
देवरुख : लोकविद्यालय, तुळसणी हायस्कूलचे मुख्याध्यापक मोहन काळे नुकतेच सेवानिवृत्त झाले. त्यांचा निरोप समारंभ संस्था व शाळेच्यावतीने नुकताच करण्यात आला. कोरोनाच्या अनुषंगाने आवश्यक त्या नियमांचे पालन करून हा कार्यक्रम झाला. यावेळी शाळेला आपले सहकार्य कायम राहील, असे काळे यांनी सांगितले.
पथदीप बंद
रत्नागिरी : शहरानजीकच्या भाट्ये पोलीस चौकी ते झरी विनायकदरम्यान उभारण्यात आलेले पथदीप गेल्या चार दिवसांपासून बंद आहेत. त्यामुळे या मार्गावर काळोखाचे साम्राज्य पसरलेले असते. हे पथदीप लवकरात लवकर सुरू करण्यात यावेत, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.
टॉवर्स नादुरुस्त
जाकादेवी : बीएसएनएलसह विविध खासगी कंपन्यांनी उभारलेले कमी क्षमतेचे टॉवर्स पावसाळ्यात नादुरुस्त झाले आहेत. त्यामुळे जाकादेवी, खालगाव पंचक्रोशीतील मोबाईल, इंटरनेटची सुविधा आठवडाभर बंद झाली आहे. दशक्रोशीशी संलग्न असलेल्या ३५ गावांना सध्या ही समस्या सतावत आहे. त्यामुळे याचा फटका विविध बँका, पतसंस्था, शासकीय, निमशासकीय कार्यालये आदींना बसत आहे.