रत्नागिरी : वेळास, ता. मंडणगड येथील समुद्रकिनारी ऑलिव्ह रिडले या समुद्री कासवाच्या विणीच्या हंगामाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे कासवमित्र,वनकर्मचारी व वन्य प्राणी मित्र यांच्यात आनंदाचे वातावरण आहे.कासव मित्र देवेंद्र १५ नोव्हेंबर २०२२ रोजी गस्त घालत असताना त्यांना समुद्रकिनारी वाळूमध्ये ऑलिव्ह रिडले या समुद्री कासव मादीने पाहिले घरटे तयार केल्याचे आढळले. या घरट्यामध्ये मादी कासवाने १०२ अंडी दिली आहेत. हे महाराष्ट्रातील पहिलेच घरटे आहे. मागील दोनवर्षी अरबी समुद्रामध्ये झालेल्या निसर्ग चक्रीवादळ व तोक्त्ये चक्रीवादळामुळे ऑलिव्ह रिडले समुद्री कासवाचा विणीचा हंगाम पुढे जावून त्यांची सुरुवात डिसेंबरमध्ये झाली.यावर्षी समुद्रामध्ये कोणत्याही प्रकारची नैसर्गिक हालचाल झाली नसल्यामुळे, नेहमीप्रमणे ऑलिव्ह रिडलेच्या विणीचा हंगाम नोव्हेंबरमध्ये सुरु झाला असावा, असा अंदाज वनअधिकारी, वन्यप्राणीमित्र यांचा आहे. यावर्षापासून कासवमित्र घरट्यांची नोंदी एम टर्टल' अॅपमध्ये करणार आहेत. दापोलीचे परिक्षेत्र वन अधिकारी वैभव बोराटे यांनी वेळास येथे भेट दिली.संवर्धन व संरक्षण...कासवांचे संवर्धन व संरक्षणांचे काम विभागीय वन अधिकारी दीपक खाडे, सहाय्यक वनसंरक्षक सचिन निलख यांच्या मार्गदर्शनाखाली वनविभाग रत्नागिरी (चिपळूण) व कांदळवन प्रतिष्ठान मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने सुरु झाले आहे.
रत्नागिरीतील वेळास समुद्रकिनारी कासव विणीच्या हंगामाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2022 6:13 PM