दापोली : रत्नागिरी कारागृहातून पळालेला एका आरोपीला पुन्हा पकडणाऱ्या दापोली पोलिसांनी आणखी एक चमकदार कामगिरी करून दुसऱ्या फरार आरोपीच्याही मुसक्या आवळल्या. मध्यरात्रीपासून पहाटेपर्यंत राबवलेले हे आॅपरेशन यशस्वी झाले असून, आरोपी रितेश कदम याला त्याच्या आंबवली येथील घरातच ताब्यात घेण्यात आले.किरण मोरे व रितेश कदम हे दोन आरोपी २७ जुलै रोजी रत्नागिरी कारागृहातून पळाले होते. या दोघांपैकी किरण मोरेला दापोलीचे पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांनीच सापळा रचून पनवेल येथे पकडले होते. मात्र त्यावेळी पोलिसांना गुंगारा देऊन पळालेल्या रितेश कदमला आंबवली येथे सापळा रचून पहाटे तीन च्या सुमारास पोलिसांनी अटक केली.किरण मोरे याला चोरी व दरोड्याप्रकरणी तर रितेश कदमला आंबवली येथील चौथीमध्ये शिकणाऱ्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आले होते. दोघेही कच्चे कैदी म्हणून कारागृहात होते. तेथे त्यांची एकमेकांशी ओळख झाली. दोघांनी मिळून प्लॅन केला व कारागृहातून पळाले.यातील किरण मोरे बायकोच्या संपर्कात असल्याचे दापोली पोलिसांच्या लक्षात आल्याने राज्याबाहेर पळून जाण्याच्या आतच दापोली पोलिसांनी वेशांतर करुन त्याच्या पत्नीचा पाठलाग केला व पनवेल येथे किरण मोरेच्या मुसक्या आवळल्या. रितेशही त्याच्यासोबत होता. पण गर्दीचा फायदा घेत रितेशने पोलिसांना गुंगारा देऊन पलायन केले.मुख्य आरोपी किरण मोरे पोलिसांच्या हाती लागल्याने रितेशला पकडण्याची जबाबदारी पोलीस निरीक्षक प्रमोद मकेश्वर यांच्याकडे देण्यात आली. त्यानंतर मकेश्वर यांनी फिल्डींग लावायला सुरुवात केली. रितेश कदम त्याच्या आंबवली गावात येऊन गेल्याची माहिती तपासात पुढे आली. यामुळे तो आजूबाजूच्या गावातच लपला असल्याची खात्री झाली. त्याच्या घरी केवळ वडीलच राहत असल्याने पोलिसांनी वडिलांवर पाळत ठेवली. परंतु काहीही शोध लागत नव्हता. वडिलांना मुलाबद्दल विचारले असता त्यांनी आपल्याला काहीही माहीत नाही असेच भासवले. परंतु त्यांच्या बोलण्यातून तो वडिलांच्या संपर्कात असल्याची पोलिसांची खात्री पटली. / पान ५ (आणखी वृत्त हॅलो १ वर)
कारागृहातून पळालेला दुसरा आरोपी जाळ्यात
By admin | Published: July 15, 2014 12:13 AM