गुहागर : रत्नागिरी गॅस आणि विद्युत प्रकल्पातील सुरक्षारक्षक हरिशकुमार गौड याने आपल्या दोन सहकाऱ्यांना ठार केले व पत्नी प्रियांका हिला जखमी करुन स्वत:ला गोळी मारुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आज (शुक्रवारी) दुपारी १२ वा. हरिषकुमार याला रुग्णालयातून सोडल्यानंतर गुहागर पोलिसांनी अटक करुन गुहागर न्यायालयात हजर केले असता त्याला २२ मार्चपर्यंत (पाच दिवसांची) पोलीस कोठडी देण्यात आली आहे.हरिषकुमार गौड या सीआयएसएफ जवानाने सहकाऱ्यांच्या व अधिकाऱ्यांच्या जाचाला कंटाळून आपले सहकारी बाळू गणपती शिंदे व रनिष पी. आर. यांना गोळी मारुन ठार केले. यावेळी गार्ड हॉस्टेलच्या एका रुममध्ये लपून बसलेल्या हरिषकुमारला पत्नी प्रियांका समजावण्यासाठी गेली होती. यावेळी हरिषकुमारने स्वत:ला गोळी मारण्याचा प्रयत्न केला असता त्याला रोखताना प्रियांकाच्या छातीत गोळी लागली. यानंतर हरिषकुमारने स्वत:ला गोळी मारुन घेतली. या दोघांनाही चिपळूण येथील रुग्णालयात अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. प्रियांका गर्भवती असल्याने कोल्हापूर येथील नामांकित रुग्णालयात प्रसुतीसाठी नेण्यात आले होते. सध्या रत्नागिरी गॅस कंपनीतील रुमवर ती राहात आहे.हरिषकुमार याच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने आज दुपारी चिपळूण येथील लाईफ केअर रुग्णालयातून दुपारी १२ वाजता गुहागर पोलीस निरीक्षक विनीत चौधरी यांनी त्याला ताब्यात घेतले. हरिषकुमारला दोघा सहकाऱ्यांना ठार केल्याबद्दल हत्यार कायदा अधिनियम १९६९ कलम २७ (३) अन्वये व ३०९ कलमप्रमाणे आत्महत्या केल्याप्रकरणी अटक करण्यात आली. याप्रकरणी अधिक तपास गुहागर पोलीस करत आहेत. (प्रतिनिधी)दोन सहकाऱ्यांना गोळ््या घालून केले ठार.पत्नीला जखमी करून स्वत:वरही गोळी मारून आत्महत्येचा प्रयत्न.रूग्णालयातून सोडताच पोलिसांनी केली अटक.पत्नीवर कोल्हापूर येथे उपचार केल्यानंतर गुहागरात आणले.५ दिवसांची पोलीस कोठडी.
सुरक्षारक्षक हरीशकुमार गौड याला अखेर अटक
By admin | Published: March 18, 2016 10:38 PM