khed-photo281
राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट फाईट स्पर्धेत रत्नागिरी जिल्ह्याचा संघ सहभागी झाला हाेता.
लाेकमत न्यूज नेटवर्क
खेड : कर्जत येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय पिंच्याक सिलॅट फाईट स्पर्धेत खेड येथील पिंच्याक सिलॅट स्पोर्ट्स असोसिएशनच्या खेळाडूंनी ९ सुवर्ण, ४ रौप्य व ५ कांस्य पदके पटकावली. या स्पर्धेत सहभागी झालेल्या १३ खेळाडूंची काश्मीरमधील श्रीनगर येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
राष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षिका सायली सुनील शिंदे व टीमचे व्यवस्थापक श्रीधर जागडे यांच्या नेतृत्त्वाखाली ही टीम श्रीनगरला होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली आहे. कर्जत येथील राज्यस्तरीय स्पर्धेत ओम सुनील शिंदे, पार्थ प्रवीण कदम, रितू बोराटे, सुहान बैकर, शर्वरी गोपणे, शर्वरी शिगवण, भक्ती माळी, श्रेया भाटकर व शंतनु झगडे यांनी सुवर्णपदक पटकावले. वैष्णव शिंदे, ऋषिराज बोराटे, वैष्णवी जागडे, आयुषा सकपाळ यांनी रौप्यपदक मिळवले. बाळनाथ मोरे, वृषाली तांबे, तुषार साळुंखे, साईप्रसाद वराडक, स्नेहा भाटकर या खेळाडूंनी कांस्य पदक मिळवले. या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.