लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमानुसार खासगी विनाअनुदानित किंवा कायम विनाअनुदानित किंवा स्वयंअर्थसहाय्यता शाळांमध्ये वंचित व दुर्बल घटकांतील मुलांसाठी प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा राखीव ठेवण्यात येतात. याअंतर्गत यावर्षी जिल्ह्यातील ९५ शाळांत ८६४ जागा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. ९३५ पालकांनी अर्ज केले होते, त्यापैकी ६०९ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
२०२१-२२ शैक्षणिक वर्षासाठी आरटीईची सोडत काढण्यात आली आहे. जिल्ह्यातील ९५ शाळांमध्ये ८६४ जागा उपलब्ध करण्यात आल्या होत्या. यासाठी ९३५ विद्यार्थी प्रवेशासाठी पालकांनी ऑनलाईन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ६०९ बालकांची लॉटरीद्वारा निवड झाली आहे. त्यांनी शाळेत जाऊन प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या विद्यार्थ्यांची आरटीईतंर्गत प्रवेशासाठी निवड झालेली आहे, अशा विद्यार्थ्यांची कागदपत्रे मुख्याध्यापकांनी शाळास्तरावर एकत्रित करून पात्र विद्यार्थ्यांची यादी व कागदपत्रे तालुकास्तरावरील पडताळणी समितीकडे सादर करायची आहेत. तालुकास्तरीय पडताळणी समितीने शाळांकडून प्राप्त झालेल्या यादीतील पात्र विद्यार्थ्यांचे आरटीई ऑनलाईन पोर्टलवर दि. ३१ ऑगस्टपर्यंत प्रवेश निश्चित करून विद्यार्थ्यांची यादी संबंधित शाळांना द्यायची आहे.
---------------------------
तालुका आरटीई शाळा रिक्त जागा प्राप्त अर्ज निवड झालेले विद्यार्थी
मंडगणड ०५ २० १६ ९
दापोली १५ ९९ ८४ ६४
खेड १३ १७२ २४६ १३९
चिपळूण १९ १७५ १७२ १०३
गुहागर ०५ ४१ ४९ २६
संगमेश्वर १० ४३ ४६ ३५
रत्नागिरी १९ २६९ २९१ २०७
लांजा ०४ १९ १८ १३
राजापूर ०५ २६ १३ १३
एकूण ९५ ८६४ ९३५ ६०९