शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेनेला भाजपापासून वेगळं करण्यासाठी 'ते' विधान, मग...; शरद पवारांचा गौप्यस्फोट
2
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
3
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
4
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर
5
"आम्ही १७० पेक्षा जास्त जागा जिंकणार", विधानसभा निवडणुकीबाबत डीके शिवकुमार यांचे विधान
6
देशातील सर्वात मोठी सरकारी बँक घेणार १.२५ अब्ज डॉलर्सचं लोन, पाहा काय आहे प्लान?
7
Uddhav Thackeray : "गद्दारांना मतदारच जागा दाखवणार, तुरुंगात कांदे सोलायला पाठवू"; उद्धव ठाकरे कडाडले
8
Zomato, Jio Financial निफ्टी ५० मध्ये येऊ शकतात; BPCL, Eicher Motors बाहेर जाणार?  
9
छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांविरोधात मोठी कारवाई, सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत ५ जण ठार
10
सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री रीटा आंंचन यांचं दुःखद निधन, ७० च्या दशकातील बॉलिवूड सिनेमे गाजवले
11
माधुरी दीक्षितला सलमान खान-संजय दत्तसोबत 'साजन' सिनेमा न करण्याचा मिळाला होता सल्ला, अभिनेत्रीनं सांगितलं कारण
12
पर्थ टेस्टसाठी शास्त्रींनी निवडली बेस्ट संभाव्य प्लेइंग इलेव्हन; सर्फराजपेक्षा KL राहुल भारी?
13
फडणवीसांनी 'व्होट जिहाद'वरून चढवला हल्ला; शरद पवारांनी दिलं प्रत्युत्तर; म्हणाले...
14
"ही भाषा...", अजित पवार यांच्या 'वाली' वक्तव्यावर सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या; PM मोदी, अमित शाह यांचंही नाव घेतलं!
15
भामरागडमध्ये पर्लकोटा नदीजवळ स्फोट, पोलिसांकडून सर्च ऑपरेशन
16
भाजपाला मत देणाऱ्या मुस्लिमांना शोधून काढा, अन्...; महाविकास आघाडीवर गंभीर आरोप
17
'अबीर गुलाल'नंतर नुकतीच सुरु झालेली कलर्स मराठीवरील नवी मालिका होणार बंद? चाहत्यांना धक्का
18
Meta चा Video, लोकेशनसह अलर्ट; पोलिसांनी १२ मिनिटांत ९ किमी जाऊन वाचवला तरुणाचा जीव
19
Sunita Williams : सुनीता विल्यम्सच्या अडचणी वाढल्या, आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात तडे, अनेक ठिकाणाहून गळती
20
जेफरीजनं 'या' ५ Stock वर सुरू केलं कव्हरेज, दिला खरेदीचा सल्ला; HAL, PNB सारख्या दिग्गजांचा समावेश

‘राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान’च्या समितीवर किरण धांडोरे यांची निवड

By मेहरून नाकाडे | Published: March 13, 2024 3:46 PM

केंद्र शासनाच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या अखत्यारीतील समिती

रत्नागिरी : केंद्र शासनाच्या राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या मुख्य समितीवर गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे ग्रंथपाल किरण धांडोरे यांची निवड करण्यात आली आहे. ही निवड तीन वर्षांसाठी करण्यात आली आहे.किरण धांडोरे हे गेली २६ वर्षे महाविद्यालयाच्या कै. बाबुराव जोशी ग्रंथालयात कार्यरत असून ते ग्रंथालय शास्त्रातील पदव्युत्तर पदवी, भूगर्भशास्त्रात पदव्युत्तर पदवी, सेट व नेट परीक्षा व पत्रकारिता पदवी उत्तीर्ण आहेत. सध्या ते गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे पीएच.डी. करत असून त्यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या ग्रंथालय संचालनालय विभागात ‘ग्रंथालय संचालक’ म्हणून काम पाहिले आहे. या ठिकाणी काम करताना त्यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व शासकीय ग्रंथालयांचे संगणकीकरणकरून भारत सरकारच्या ई-ग्रंथालय प्रणालीमध्ये समावेश केला.

थोर समाज सेवक राजा राममोहन रॉय यांच्या नावाने राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठान ही सांस्कृतिक मंत्रालय, भारत सरकारची मध्यवर्ती स्वायत्त संस्था आहे. केंद्र शासनाने नियुक्त केलेली राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानकरिता सर्वोच्च योजना तयार करणारी एक प्रमुख समिती कार्यान्वित असून या समितीत २२ सदस्य आहेत. यामध्ये विद्यापीठाचे कुलगुरू, शिक्षणतज्ज्ञ, प्रशासक, ग्रंथपाल आणि वरिष्ठ प्रशासनिक अधिकारी यांचा समावेश आहे. गंगापुरम किशन रेड्डी हे केंद्र सरकारच्या सांस्कृतिक विभागाचे मंत्री असून विद्यमान समितीचे अध्यक्ष आहेत.देशातील विविध राज्ये, केंद्रशासित प्रदेश यामधील राज्य ग्रंथालय नियोजन समिती मार्फत भारतातील सार्वजनिक ग्रंथालय विकासाबाबत कार्य करणारी प्रमुख समिती आहे. भारतातील सार्वजनिक ग्रंथालयविषयक धोरण ठरवणे, ग्राम ग्रंथालय ते राष्ट्रीय ग्रंथालयापर्यंत उत्कृष्ट ग्रंथालयांची साखळी तयार करणे, भारतातील सर्वाजनिक ग्रंथालयांना आर्थिक मदत करणे, ग्रंथालयांच्या विकासासाठी पूरक असे संशोधन करणे आणि केंद्र सरकारला देशातील ग्रंथालयांच्या विकासाबाबत सल्ला देणे अशी या समितीची प्रमुख उद्दिष्ट्ये आहेत.या निवडीबद्दल संस्थेच्या कार्याध्यक्षा शिल्पा पटवर्धन, कार्यवाह सतीश शेवडे, गोगटे जोगळेकर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मकरंद साखळकर यांनी धांडोरे यांचे अभिनंदन केले आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरी