शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
3
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
4
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
5
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
6
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
8
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
9
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
10
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
12
ड्रग्स सेवन केल्याप्रकरणी न्यूझीलंडच्या गोलंदाजांवर बंदी; सचिन-सेहवागची घेतली होती विकेट
13
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
14
हुश्श... उमेदवारांच्या कॉल, जाहिरातींनी मतदारांना भंडावून सोडलेले; अखेर प्रचार संपला, आता...
15
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार
16
ओवेसींचा मोठा दावा...! म्हणाले, "भारतात बसून ट्रम्प यांना जिंकून दिलं..."; CM योगींनाही खुलं आव्हान
17
'उद्धव ठाकरे सत्तेसाठी काँग्रेसच्या मांडीवर बसले', शेवटच्या प्रचारसभेत जेपी नड्डांचे टीकास्त्र
18
IPL मेगा लिलावासाठी परफेक्ट ऑडिशन; Marcus Stoinis नं पाक गोलंदाजांना धु धु धुतलं!
19
“जनताच महायुतीला सत्तेतून खाली खेचेल, लोकसभेनंतर विधानसभेला मविआला विजयी करा”: खरगे
20
“एक हैं तो सेफ हैं, राहुल गांधी फेक हैं, तेव्हा अदानी कोणाचे होते?”; विनोद तावडेंचा पलटवार

हक्काच्या घरासाठी सात वर्षाच्या ‘रुद्र’चे उपोषण, तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत कुटुंबिय गमावले

By संदीप बांद्रे | Published: May 08, 2023 6:19 PM

तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला

चिपळूण : तिवरे धरणफुटीच्या दुर्घटनेत भेंदवाडीतील २२ जणांचा हकनाक बळी गेला होता. या घटनेत आपले आई वडील आणि बहीण गमावलेला सात वर्षीय रूद्र चव्हाण याला अद्याप घर मिळालेले नाही. त्याचा हक्काचे घर मिळण्यासाठी त्याच्यासह नातेवाईकांनी प्रांत कार्यालयासमोर आजपासून उपोषण सुरू केले आहे. रूद्रच्या पालकत्वाचा वाद न्यायालयात प्रलंबित असल्याने तसेच घराची सोडत काढताना त्यांच्या नातेवाईकांनी रूद्रसाठी घराची मागणी केली नसल्याचे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.

तिवरेतील घटनेत रूद्र चव्हाण याचे वडील रणजित, आई ऋतुजा तसेच बहीण दुर्वा हिचा मृत्यू झाला होता. या घटनेवेळी रूद्र चिपळुणातील पेठमाप येथे आत्याकडे वास्तव्यास असल्याने वाचला होता. दरम्यान मृतांच्या नातेवाईकांना शासकीय मदत मिळाली. या मदत वाटपावेळी रूद्रच्या पालकत्वाचा वाद सुरू झाला. रूद्रचे चुलते आणि आत्यांनी पालकत्वासाठी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यावर निर्णय झालेला नाही.पुनर्वसन अंतर्गत अलोरे येथील घरांच्या सोडतीत रूद्रला घर मिळाले नाही. अशातच सोडत लागलेल्यापैकी सीताराम महादेव रामाणे यांनी तिवरे गावी पुनर्वसन करण्याची मागणी केल्याने घर नं. २१ रिकामे होते. हे घर रूद्रला देण्यात यावे, असे आदेश पालकमंत्री उदय सामंत यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते.

त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी येथील प्रांताधिकाऱ्यांना याबाबतची योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचना केल्या होत्या. त्याप्रमाणे रूद्रचे काका अजित चव्हाण यांच्याकडे या घराची चावी सुपुर्द केली आहे. परंतू, रूद्रची आत्या मनाली संतोष माने हिने त्यावर आक्षेप घेतला आहे. अजित चव्हाण यांनी स्वतःला घर घेताना आधी रूद्रचा विचार करायला हवा होता, असा मुद्दा उपस्थित करून घराच्या मागणीसाठी प्रांत कार्यालयासमोर सोमवारपासून उपोषण सुरू केले आहे. रूद्र रंजित चव्हाण याच्या सोबत त्याची आत्या मनाली संतोष माने, वैष्णवी विनोद सकपाळ, सुधाकर हरिभाऊ चव्हाण, मधुकर रामभाऊ साळुंखे (आजोबा), मीनल अमित साळसकर (मावशी) उपोषणाला बसले आहेत.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीDamधरणagitationआंदोलन