रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

By अरुण आडिवरेकर | Published: April 12, 2023 12:12 PM2023-04-12T12:12:41+5:302023-04-12T12:13:28+5:30

आजारामुळे तपासात अडथळे

Shahrukh who burned train passengers alive in Kerala has links with terrorists | रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

रेल्वे प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरुखचा दहशतवाद्यांशी संबंध?, पोलिसांनी रत्नागिरीत आवळल्या होत्या मुसक्या

googlenewsNext

रत्नागिरी : केरळ येथे रेल्वे प्रवासात प्रवाशांना जिवंत जाळणाऱ्या शाहरूख सैफी याचे दहशतवाद्यांशी संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त होत आहे. त्याला रेल्वेचा पूर्ण डबाच पेटवून द्यायचा होता, अशीही माहिती आता समोर येत आहे. 

केरळमधील घटनेनंतर सैफी पसार झाला होता. त्यानंतर त्याला रत्नागिरी पोलिस व केंद्रीय गुप्तचर यंत्रणा, महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने (एटीएस) संयुक्तरित्या कारवाई करत ४ एप्रिल २०२३ रोजी रात्री रत्नागिरी रेल्वे स्थानक परिसरातून ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्याला केरळ पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. तर महाराष्ट्र एटीएस पथकाने सैफी याची चौकशी केली असता ही घटना पूर्वनियोजित असल्याचा संशय महाराष्ट्र एटीएसकडून व्यक्त करण्यात आला होता.

केरळ पोलिसांसोबतच राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) या घटनेचा तपास करत आहे. प्राथमिक तपासात सैफी हा दिल्ली येथील शाहीनबाग परिसरातील रहिवासी असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्याच्यावर दहशतवादी विचारसणीचा प्रभाव पडत होता. तसेच त्याला अनुचित प्रकार करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत असल्याचे तपासात आढळले आहे. त्यानुसार पोलिसांकडून तपास सुरू आहे.

दिल्ली येथून तो केरळपर्यंत कसा आला, यांचा शोध पोलिस घेत आहेत. त्याला कोणीतरी केरळ येथे आणले असावेत असा संशय आहे. त्याच्याशी कोण व्यक्ती संपर्कात होत्या, याचाही तपास केला जात आहे. यासाठी त्याचा मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केला असून, मागील ६ महिन्यातील कॉल डिटेल्स, व्हॉटसॲप, फेसबुकवरील संभाषण आदींची पडताळणी पोलिसांकडून करण्यात येत आहे.
 
आजारामुळे तपासात अडथळे

केरळ पोलिसांच्या ताब्यात असलेल्या सैफी याला काविळचा आजार असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यानुसार त्याला कोझीकोडे येथील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यामुळे पोलिसांच्या तपास कामात अडथळे निर्माण होत आहेत.

Web Title: Shahrukh who burned train passengers alive in Kerala has links with terrorists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.