देवरुख : देवरुख शिक्षण प्रसारक मंडळाच्या आठल्ये-सप्रे-पित्रे महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना (२ स्तर) विभागातर्फे राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली. यानिमित्ताने महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नरेंद्र तेंडोलकर यांनी प्रतिमापूजन करून पुष्पहार अर्पण केला.
छत्रपती शाहू महाराज यांची देदीप्यमान कारकीर्द विद्यार्थ्यांना समजावी यासाठी त्यांना सोशल मीडियाद्वारे माहिती उपलब्ध करून देण्यासाठी प्रा. सीमा शेट्ये, प्रा. विजय मुंडेकर, प्रा. शिवराज कांबळे यांनी पुढाकार घेतला. या कार्यक्रमासाठी पर्यवेक्षक प्रा. एम. आर. लुंगसे, महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा. सुभाष माईंगडे, राष्ट्रीय छात्र सेना प्रमुख प्रा. उदय भाट्ये, प्रा. अभिनय पातेरे, सहायक आयुब तडवी, विश्वास जठार, सचिन दांडेकर, स्वप्निल कांगणे उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. सानिका भालेकर यांनी केले होते.