यावेळी विचार व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष रोहित मयेकर म्हणाले की, ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सर्वसामान्य जनतेला ज्ञान मिळवून देण्याचे महान कार्य छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांनी केले. त्यांनी वंचित, आदिवासी, मागास व बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी केलेल्या महान शैक्षणिक कार्यामुळेच आज देशात समानता दिसून येत असल्याचेही ते म्हणाले. छत्रपती शाहू महाराजांच्या जीवनचरित्राचे प्रत्येकाने वाचन करून शाहू महाराजांचे कार्य समजून घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी संस्थेचे संचालक सुरेंद्र माचिवले, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या स्नेहा पालये, प्रा. अवनी नागले, प्रा. शामल करंडे, तसेच कर्मचारी अमेश गावडे, किरण मुंडेकर, मीनाक्षी ठीक, सचिन सावंत उपस्थित होते.
-------------------------
चाफे मयेकर महाविद्यालयात छत्रपती शाहू महाराज यांना संस्था सचिव रोहित मयेकर यांनी अभिवादन केले.