चिपळूण : राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार तब्बल ४ वेळा मुख्यमंत्री झाले आहेत. त्यांनी कधी लाडक्या बहिणींवर दया दाखवली नाही आणि मराठा आरक्षणाचा प्रश्नही सोडवला नाही. तो त्यांनी कायम भिजतच ठेवल्याची टीका खासदार नारायण राणे यांनी शुक्रवारी महायुती पदाधिकारी व कार्यकर्ता बैठकीत केली.चिपळूणनजीकच्या कापसाळ येथील माटे सभागृहात महायुतीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांची बैठक झाली. महाविकास आघाडीचे नेते महिलांना ३,००० रुपये देणार असल्याची घोषणा करतात. यांच्याकडे सत्ता आहे का, खिशात काही नाही, मग ते कुठून देणार, कसे देणार, हा प्रश्न खासदार राणे यांनी केला.यावेळी शेखर निकम यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार डॉ. विनय नातू, सुरेखा खेराडे, राजेश सावंत, जयंद्रथ खताते, दिशा दाभोळकर उपस्थित होत्या.
शरद पवार चारवेळा मुख्यमंत्री, पण आरक्षणाचा प्रश्न भिजतच; खासदार नारायण राणे यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 12:24 PM