राजापूर : भारतीय रिझर्व्ह बँकेच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या येथील राजापूर अर्बन को-ऑप. बँकेच्या सहा सदस्यीय बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षपदी राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. शशिकांत सुतार यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचा गुरुवारी राजापूर तालुका बार असोसिएशनतर्फे सत्कार करण्यात आला.
ॲड. सुतार हे राजापूर तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून कार्यरत असून, त्यांची बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. या सत्कार साेहळ्याला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अभिजित अभ्यंकर, सचिव सुशांत पवार, खजिनदार अविनाश कुवेस्कर, ज्येष्ठ वकील प्रकाश रानडे, राजापूरचे नगराध्यक्ष जमीर खलिफे, चंद्रशेखर अभ्यंकर, गुरुदत्त खानविलकर, पराग मोदी, अभिषेक ढवळे, समीर कुंटे, सहसचिव राहुल राणे, विकास पळसमकर, अर्चना पाटील, राजन देवरुखकर, मिलिंद चव्हाण, सुनील मिस्त्री, कपिल राणे, महिला प्रतिनिधी दिलनवाज वस्ता, रोजिना खोपेकर आदींसह वकील सदस्य उपस्थित होते.