रत्नागिरी : बालदिनाचे औचित्य साधून येथील लर्निंग पॉर्इंटतर्फे शहरामध्ये बालकांची रॅली काढण्यात आली. घोडागाडी, सायकल, स्केटिंगसह २००पेक्षा अधिक मुले या रॅलीमध्ये सहभागी झाली होती. नेहमीच वाहनांनी गजबजलेल्या शिवाजीनगर ते स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहापर्यंतचा रस्ता बालकांनी फुलून गेला होता. रत्नागिरीचे नगराध्यक्ष महेंद्र मयेकर यांच्या हस्ते प्रभातफेरीचे उद्घाटन करण्यात आले. त्यांच्यासमवेत आंतरराष्ट्रीय योगासनपटू पूर्वा किनरे, रोटरी क्लबचे विनायक हातखंबकर, पेडीअॅट्रिक असोसिएशनचे डॉ. संतोष बेडेकर, लायन्स क्लबचे दत्तप्रसाद कुलकर्णी, संस्थेचे संचालक सुखदा सारोळकर, सचिन सारोळकर आदी मान्यवर उपस्थित होते. गेल्या ११ वर्षांपासून लर्निंग पॉर्इंट या मानसशास्त्रीय केंद्रातर्फे विकासात्मक उपक्रम राबविले जात आहेत. आजच्या प्रभातफेरीला रत्नागिरीकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. लर्निंग पॉर्इंटच्या शिवाजीनगर शाखेपासून स्वा. सावरकर नाट्यगृहापर्यंत प्रभातफेरी काढण्यात आली. तीनचाकी सायकल, घोडागाडी घेऊन प्रभातफेरीमध्ये सुरुवातीला १०० मुले सहभागी झाली होती. नंतर आरोग्य मंदिर येथील संस्थेच्या शाखेपासून आणखी १२० मुलं सहभागी झाली. यामध्ये लर्निंग पॉर्इंटचे ३ वर्षे वयोगटावरील विद्यार्थी तसेच जी. जी. पी. एस., कॉन्व्हेंट स्कूल, कॉन्व्हेंट स्कूल उद्यमनगर, रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्र. ८, माने इंटरनॅशनल स्कूल, प. अ. मुकबधीर संस्था, स्वयंसेतू संस्था लाभार्थी परटवणे येथील विद्यार्थी, माहेर संस्था तसेच पटवर्धन शाळेतील गुरुकुल प्रकल्पाचे साखकलस्वार विद्यार्थी सहभागी झाले होते. प्रभातफेरीमध्ये सहभागी झालेले झांजपथक, चित्ररथ विशेष आकर्षण ठरले होते. ‘भारत माता, चाचा नेहरू, शाळा, वाघ बचाव’ संदेश देणारे चित्ररथ लक्ष वेधून घेत होते. या कार्यक्रमाचे नियोजन इव्हेंट मेनिया आणि क्रिएटीव्ह पीआर या संस्थांच्या स्वयंसेवकांनी केले होते. (प्रतिनिधी)रॅलीने परिसर गजबजला...प्रभातफेरी दरम्यान वाहतुकीला अडथळा होऊ नये तसेच मुलांना बाल दिन उत्साहात साजरा करता यावा म्हणून वाहतूक पोलिसांनीही वाहतूक व्यवस्थेचे नियोजन केले होते. प्रभातफेरीदरम्यान हॉटेल कार्निव्हलने मुलांसाठी, पाण्याची तर हॉटेल विवेकने केक, चॉकलेट्स आणि पाण्याची व्यवस्था केलेली.वेशभूषेतून बालकांचा संदेशपंडित नेहरुंच्या जन्मदिनाचे औचित्य साधून रत्नागिरी शहरात काढण्यात आलेल्या प्रभातफेरीमध्ये विविध संस्थांनी भाग घेतला. लर्निंग पॉर्इंटने पुढाकार घेतलेल्या या रॅलीने शहरात वातावरण निर्माण केले. विविध प्रकारच्या वेशभूषेत बालकांनी स्वच्छ भारताचा संदेश लोकांपर्यंत पोहोचवला. हा कार्यक़्रम उत्तमरित्या पार पडल्याचे संयोजकांनी सांगितले. नेहमी वाहनांनी गजबजलेला परिसर आज बालकांच्या अनोख्या अभिव्यक्तीमुळे फुलून गेला होता. अनोख्या वेशभूषेत लहान मुलांनी साकारलेल्या या प्रभातफेरीने पंडित नेहरुंचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवला गेला. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बालकांच्या माध्यमातून स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचवण्याचे केलेले आवाहन अनेक ठिकाणी तंतोतंत पाळले गेल्याचे पाहायला मिळाले. या प्रभातफेरीमधून संदेश वाहकाची भूमिका बालकांनी उत्तमरित्या बजावली. भारत मातेचे दृश्य विद्यार्थ्यांनी साकारले होते. या प्रभात यात्रेला उत्तम प्रतिसाद लाभला. लर्निंग पॉर्इंटच्या शिवाजीनगर शाखेपासून प्रभातफेरीला प्रारंभ झाला आणि स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहाजवळ सांगता झाली. बालदिनानिमित्त सलग ११ वर्षे ही संस्था प्रभातफेरी काढत आहे.लर्निंग पॉईटतर्फे बालदिनानिमित्त आयोजन.शिवाजीनगर ते स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहापर्यंतचा रस्ता बालकांनी फुलला.प्रभातफेरीला रत्नागिरीकरांचा उत्स्फूर्त सहभाग.प्रभातफेरीमध्ये सहभागी झालेले झांजपथक, चित्ररथ विशेष आकर्षण ठरले होते. ‘भारत माता, चाचा नेहरू, शाळा, वाघ बचाव’ संदेश देणारे चित्ररथ.
बालचमूंची चमकदार रॅली
By admin | Published: November 14, 2014 10:52 PM