खेड : तालुक्यातील ग्रामीण भागासह शहरातील शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी शिवसेना नेते रामदास कदम व आमदार योगेश कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. यावेळी शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
खेड येथील पंचायत समिती सभापती निवास येथे शिवसेना नेते रामदास कदम, आमदार योगेश कदम, माजी जिल्हा प्रमुख शशिकांत चव्हाण, सभापती मानसी जगदाळे, जिल्हा परिषद सदस्य अरुण कदम, तालुकाप्रमुख विजय जाधव, उपसभापती जीवन आंब्रे, माजी सभापती सिकंदर जसनाईक, बशीर हमदुले पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत अनेकांचे पक्ष प्रवेश झाले. तालुक्यातील मुरडे, कशेडी व शहरातील डाकबंगला परिसरातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. रामदास कदम व योगेश कदम यांच्यासह शिवसेना पदाधिकारी यांनी त्यांचे स्वागत केले.