शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटक आर्थिक संकटात! जेवढी द्यायची ऐपत, तेवढीच आश्वासने द्या...; खर्गेंनी महाराष्ट्रावरून नेत्यांचे कान टोचले
2
पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेच्या अध्यक्षांचे निधन; मोदींकडून शोक व्यक्त
3
ई-स्कूटर घ्या; पण तक्रारींचे काय? कंपन्यांविराेधात १२ हजार तक्रारी, केंद्र सरकार करणार चाैकशी
4
शरद पवारांच्या भेटीसाठी बारामतीत मोठी गर्दी; गोविंदबागेत उभे रहायलाही जागा नाही...
5
आधी बारावी, मग नववी; अस्लम शेख यांच्या उमेदवारी अर्जावर आक्षेप, विनोद शेलार कोर्टात जाणार  
6
भेटायला आले, नमस्कार केला अन् गोळ्या झाडल्या; दिवाळी साजरी करणाऱ्या काका-पुतण्याची हत्या
7
मनसे कार्यकर्त्यांनी मनसेच्या उमेदवाराचेच कार्यालय फोडले; अकोल्यात मोठा राडा, नेमके काय घडले...
8
अर्जुन कपूरने ब्रेकअप झाल्याचं सांगताच मलायकाची पोस्ट, म्हणते - "एका क्षणासाठी..."
9
मी कुठे सांगतो माझा प्रचार करा, विरोध अपेक्षितच; नवाब मलिक भाजप नेत्यांवर कडाडले
10
HDFC Bankची उपकंपनी HDB फायनान्शिअल सर्व्हिसेस आणणार IPO; 'इतके' हजार कोटी उभे करणार
11
'सिंघम अगेन'च्या शेवटी मिळालं खास सरप्राइज! सलमान खानच्या एन्ट्रीने झाली नव्या सिनेमाची घोषणा
12
भारतात 2050 पर्यंत मुस्लीम लोकसंख्येत मोठी वाढ होणार, 'या' 3 देशांत हिंदू जवळपास 'संपुष्टात' येणार!
13
'विराट' विक्रम मोडला! इथं पाहा IPL च्या इतिहासातील Expensive Retained Players ची यादी
14
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
15
प्रियांका गांधींनी गुंतवलेल्या Mutual Fund नं किती दिले रिटर्न? तुमच्यासाठी फायद्याचा सौदा आहे की नाही?
16
सदा सरवणकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट, माहिमच्या जागेवर चर्चा, मोठा निर्णय होणार?
17
IND vs NZ 3rd Test : न्यूझीलंडनं टॉस जिंकला, मॅच कोण जिंकणार?
18
गॅस सिलिंडर, UPI पेमेंट ते तिकीट बुकिंग; आजपासून बदलले 'हे' नियम बदलले, थेट खिशावर होणार परिणाम
19
आजचे राशीभविष्य : आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
20
अमृता खानविलकरची स्वप्नपूर्ती! घेतलं नवीन घर, व्हिडीओ शेअर करत दाखवली झलक

रत्नागिरी शिवसेनेत सध्या घडतंय बिघडतंय, पक्ष सोडून जाणाऱ्यांना थोपविण्याचे आव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 2:04 PM

भास्कर जाधव राजन साळवी या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी

अरुण आडिवरेकररत्नागिरी : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशाण फडकवत वेगळा गट तयार केला आहे. या गटात रत्नागिरीचे आमदार उदय सामंत आणि दापाेलीचे आमदार याेगेश कदम सामील झाले आहेत. त्यांचे समर्थन करत अनेकजण त्यांच्यासाेबत जात आहेत. त्यामुळे शिवसेनेत सध्या हलचल निर्माण झाली आहे. समर्थन करणाऱ्यांची उचलबांगडी केली जात आहे, तर पक्षातून काेणी जाऊ नये, यासाठी पदाधिकारी एकवटले आहेत. पक्षात सारे काही चांगले घडतंय, असे वाटत असतानाच पुन्हा सारे बिघडत असल्याने पदाधिकारीही संभ्रमात पडले आहेत.आमदार सामंत यांचे समर्थकही शिंदे गटाच्या दिशेने चालले आहेत. शिवसेनेचे काही पदाधिकारी आणि आमदार सामंत समर्थकांनी त्यांच्या दाैऱ्यात हजेरी लावली. त्यामुळे उपजिल्हाप्रमुख महेश म्हाप, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, महिला आघाडी संघटक कांचन नागवेकर यांना पदावरुन हटविण्यात आले. त्यांच्या जागी नव्याने नियुक्तीही झाली. मात्र, नियुक्ती हाेताच प्रकाश रसाळ यांनी उपजिल्हाप्रमुख पदाचा राजीनामा दिला, तर तालुका युवा संघटक वैभव पाटील यांनीही पद साेडले आहे.पक्षात नव्याने नियुक्त्या करुन पक्ष सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, पक्षातून बाहेर जाणाऱ्यांना थाेपविण्याचे आव्हान पक्षासमाेर आहे. शिवसेनेचा गड आता अबाधित ठेवण्याची जबाबदारी शिलेदारांवर येऊन पडली आहे. पक्षाला सावरण्यासाठी जुने शिवसैनिक एकवटले आहेत. पक्षात सारे बिघडत असतानाच आता सावरण्यासाठी धडपड सुरु आहे.गड राखणे आव्हानआमदार सामंत आणि आमदार कदम यांना मानणारा गट आहे. ते त्यांच्यासाेबतच जाणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे शिवसेनेचे हे गड राखण्याचे आव्हान शिलेदारांवर आहे. या मतदार संघातील घडामाेडींचा बाजूच्या मतदार संघांवरही परिणाम हाेण्याची चिन्हे आहेत.नाेंदणीचे शिवधनुष्यरत्नागिरी, लांजा, राजापूर, संगमेश्वर या चार तालुक्यात एक लाख सदस्य नाेंदणीचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. सध्याच्या बदलत्या राजकीय घडामाेडीत सदस्य नाेंदणीचे हे शिवधनुष्य पेलावे लागणार आहे. नाेंदणी केलेले कितीजण मनाने पक्षासाेबत राहणार हे औत्सुक्याचे ठरणार आहे.नगरसेवक संपर्कातशिवसेनेचे काही नगरसेवकही सामंत यांच्या बाजूने आहेत. त्यांनी दाैऱ्यात हजेरी लावल्याने हे नगरसेवक पक्षाच्या रडारवर आहेत. यापूर्वी दापाेली, मंडणगडातील अपक्ष नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. हे मूळचे शिवसैनिक आहेत. आता नगरसेवकही सामंत यांच्या साेबत जाण्याच्या तयारीत आहेत.यांच्यावर सारी भिस्तजिल्ह्यात शिवसेनेचे आमदार म्हणून उत्तर रत्नागिरीत भास्कर जाधव आणि दक्षिण रत्नागिरीत राजन साळवी कार्यरत आहेत. हे दाेन्ही आमदार पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याच साेबत राहिले आहेत. त्यामुळे या दाेन आमदारांवरच आता जिल्ह्यातील शिवसेनेत हाेणारी पडझड राेखण्याची जबाबदारी येऊन ठेपली आहे. त्यांच्यावरच आता सारी भिस्त आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीShiv SenaशिवसेनाkonkanकोकणEknath Shindeएकनाथ शिंदे