शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 05:24 PM2019-09-19T17:24:35+5:302019-09-19T17:28:11+5:30

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

Shiv Sena MPs compromise on Bandwidkar for Congress | शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

Next
ठळक मुद्देशिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप- काँग्रेस अंतर्गत वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापणार.

चिपळूण : लोकसभा निवडणुकीत मी पक्षाच्या विरोधात काम केले, असा आरोप माज्यावर करून तशी तक्रार करण्यात आली. पण मी कधीही विरोधात काम केले नाही. उलट खासदार हुसेन दलवाई यांनी जाणूनबुजून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्याचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष रतन पवार, प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, युवक शहर अध्यक्ष फैसल पिलपिले, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, माजी नगरसेवक संजय तांबडे, रमेश खळे, माजी नगरसेविका सीमा चाळके, अविनाश हरदारे, बाबा लाड, विलास चिपळूणकर आदी उपस्थित होते.

यावेळी कदम पुढे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत असताना प्रत्येक तक्रार प्रांतिककडे केली जात होती. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. जिल्हाध्यक्ष पदावर काम करताना पक्ष कसा वाढेल, तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करीत होतो. संघटना बांधण्यासाठी दौरे केले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ब्लॉक कमिट्या स्थापन केल्या.

दापोली नगरपंचायतीत असलेली काँग्रेस - शिवसेना युती तोडा, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मला सांगितले होते; मात्र आमदार भाई जगताप यांनी असे करण्यास मला साफ मनाई करून दापोलीत हस्तक्षेप करू नका, असे सांगितल्याचे कदम म्हणाले. त्यामुळे अशाप्रकारे काम करण्यास अटकाव केला जात असेल तर अशा पदावर काम करण्यात मला अजिबात स्वारस्य नव्हते, म्हणून मी राजीनामा दिला.

लोकसभा निवडणुकीत मी कधीही नारायण राणे किंवा अन्य कोणालाही भेटलेलो नाही. लोकसभा निवडणुकीत मी राणे यांचे काम केले, या आरोपात अजिबात तथ्य नाही. खासदार दलवाई यांच्यासारखे मुंबईत बसून पक्षाचे काम आम्ही करत नाही; तर कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करतो. मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, पक्ष सदस्य पदाचा नाही. त्यामुळे मी अद्यापही काँग्रेसमध्येच असून, पक्ष सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.

हुसेन दलवाई यांच्यावर निशाणा

जिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला केल्यानंतर खासदार हुसेन दलवाई यांनी रमेश कदम यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, रमेश कदम यांनी हुसेन दलवाई यांच्यावर उमेदवारीबाबत आरोप करून खळबळ उडवून दिली.

 

Web Title: Shiv Sena MPs compromise on Bandwidkar for Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.