शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र, झारखंडमध्ये फलोदी सट्टाबाजाराचा मूड काय? मविआ की महायुती...
2
'त्या' शोरूममध्ये काहीच आढळलं नाही; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर निशाणा
3
"कुठे आहेत निष्पक्ष निवडणुका?"; अंबादास दानवेंनी समोर आणला पैसे वाटपाचा VIDEO
4
Vidhan Sabha election: महाराष्ट्रात प्रत्येक विधानसभेला किती पक्ष रिंगणात?
5
३८ टक्क्यांनी घसरला शेअर, आता रेटिंग वाढलं; गुंतवणूकदारांच्या उड्या, लागलं अपर सर्किट
6
गृहपाठ न केल्याने शिक्षक झाला हैवान; मुलाला काठीने केली मारहाण, डोळ्याला गंभीर दुखापत
7
अक्षय शिंदे चकमक: दंडाधिकाऱ्यांपुढे पुरावे ठेवण्यास उशीर का?; हायकोर्टाचे सीआयडीवर ताशेरे
8
२०३५ चा महाराष्ट्र कसा असेल?; फडणवीसांनी मांडले ६ मुद्दे, सांगितलं पुढचं व्हिजन
9
४ सरकारी बँकांतील हिस्सा विकण्याचा मोदी सरकारचा विचार, शेअरमध्ये मोठी वाढ
10
नवीन घर घेण्यासाठी तुम्ही पीएफमधून पैसे काढू शकता का? जाणून घ्या सविस्तर...
11
बारामतीत नाट्यमय घडामोडी, युगेंद्र पवारांच्या वडिलांच्या शोरुममध्ये पोलिसांची शोध मोहीम!
12
शेअर बाजाराचे काही खरे नाही; गड्या, आपली बँकच बरी!
13
तडीपार झालेलेही मतदान करणार; पोलिसांकडून चार तासांची परवानगी
14
'सत्ते'पुढे शहाणपण नाही! सरकार वाचवण्यासाठी PM नेतन्याहू मान्य करणार हमासच्या अटी?
15
भाजपची मोठी कारवाई; माजी नगरसेवकांसह १६ जणांची भाजपकडून हकालपट्टी
16
मतदान केंद्रावरील मोबाइलबंदी योग्यच; उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली
17
मुंबईत ७६ मतदान केंद्रे ‘क्रिटिकल’; १३ केंद्र शहरातील, तर ६३ उपनगरातील!
18
लेकीला डॉक्टरांनी मृत घोषित केलं पण स्वामींनी तारलं! सविता मालपेकर यांनी सांगितला अंगावर शहारा आणणारा प्रसंग
19
बापरे! PICU वॉर्डमध्ये ऑक्सिजन पुरवठा केला जात असलेला पाईप चोरट्यांनी कापला अन्...
20
ज्या नगरसेवकाच्या वॉर्डात कमी मते, त्याचे तिकीट कापू; एकनाथ शिंदे यांचा इशारा

शिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2019 5:24 PM

शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ठळक मुद्देशिवसेनेच्या खासदारांकडे काँग्रेसच्या बांदिवडेकरांसाठी तडजोड : रमेश कदम यांचा आरोप- काँग्रेस अंतर्गत वादाची ठिणगी पडण्यास सुरूवात, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वातावरण तापणार.

चिपळूण : लोकसभा निवडणुकीत मी पक्षाच्या विरोधात काम केले, असा आरोप माज्यावर करून तशी तक्रार करण्यात आली. पण मी कधीही विरोधात काम केले नाही. उलट खासदार हुसेन दलवाई यांनी जाणूनबुजून नवीनचंद्र बांदिवडेकर यांना उमेदवारी देण्याचा पक्षश्रेष्ठींकडे आग्रह धरला आणि शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्याकडे तडजोड करून बांदिवडेकर यांना पक्षाकडून उमेदवारी मिळवून दिली, असा आरोप माजी आमदार रमेश कदम यांनी पत्रकार परिषदेत केला. याबाबत प्रांतिककडे आपण पुराव्यासह तक्रार केली असल्याचे त्यांनी सांगितले.माजी आमदार रमेश कदम यांच्या निवासस्थानी ही पत्रकार परिषद झाली. यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रशांत यादव, शहराध्यक्ष रतन पवार, प्रवक्ते वासुदेव मेस्त्री, युवक शहर अध्यक्ष फैसल पिलपिले, माजी नगराध्यक्ष अजमल पटेल, माजी नगरसेवक संजय तांबडे, रमेश खळे, माजी नगरसेविका सीमा चाळके, अविनाश हरदारे, बाबा लाड, विलास चिपळूणकर आदी उपस्थित होते.यावेळी कदम पुढे म्हणाले की, जिल्हाध्यक्ष पदावर काम करीत असताना प्रत्येक तक्रार प्रांतिककडे केली जात होती. मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जात होता. जिल्हाध्यक्ष पदावर काम करताना पक्ष कसा वाढेल, तो तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही काम करीत होतो. संघटना बांधण्यासाठी दौरे केले त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ब्लॉक कमिट्या स्थापन केल्या.

दापोली नगरपंचायतीत असलेली काँग्रेस - शिवसेना युती तोडा, असे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी मला सांगितले होते; मात्र आमदार भाई जगताप यांनी असे करण्यास मला साफ मनाई करून दापोलीत हस्तक्षेप करू नका, असे सांगितल्याचे कदम म्हणाले. त्यामुळे अशाप्रकारे काम करण्यास अटकाव केला जात असेल तर अशा पदावर काम करण्यात मला अजिबात स्वारस्य नव्हते, म्हणून मी राजीनामा दिला.लोकसभा निवडणुकीत मी कधीही नारायण राणे किंवा अन्य कोणालाही भेटलेलो नाही. लोकसभा निवडणुकीत मी राणे यांचे काम केले, या आरोपात अजिबात तथ्य नाही. खासदार दलवाई यांच्यासारखे मुंबईत बसून पक्षाचे काम आम्ही करत नाही; तर कार्यकर्त्यांमध्ये मिसळून काम करतो. मी जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, पक्ष सदस्य पदाचा नाही. त्यामुळे मी अद्यापही काँग्रेसमध्येच असून, पक्ष सोडणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.हुसेन दलवाई यांच्यावर निशाणाजिल्हाध्यक्ष पदावरून बाजूला केल्यानंतर खासदार हुसेन दलवाई यांनी रमेश कदम यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र, रमेश कदम यांनी हुसेन दलवाई यांच्यावर उमेदवारीबाबत आरोप करून खळबळ उडवून दिली. 

टॅग्स :congressकाँग्रेसRatnagiriरत्नागिरीRamesh Kadamरमेश कदम