लांजा : खासदार विनायक राऊत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे व नीलेश राणे यांच्यावर टीका केल्यानंतर लांजा भाजपतर्फे खासदार विनायक राऊत यांच्या पुतळ्याचे दहन केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून शिवसेनेने मोर्चा काढत खासदार यांचा अवमान केल्याप्रकरणी भाजप कार्यकर्ते यांच्यावर गुन्हे दाखल करा, अशी मागणी केली आहे.सिंधुदुर्ग येथील रुग्णालयाच्या उद्घाटनावेळी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी हजेरी लावली होती. त्यावेळी त्यांनी महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यानंतर खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणे, माजी खासदार नीलेश राणे यांच्यावर टीका केली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजपच्या कार्यकर्त्यांनी रविवारी खासदार विनायक राऊत यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले होते.
या प्रकारानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी शिवसेना संपर्क कार्यालय ते तहसीलदार कार्यालय असा मोर्चा काढून आपल्या निषेध व्यक्त केला. या मोर्चात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.यावेळी उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, उपतालुकाप्रमुख सुरेश करंबेळे, विधानसभा क्षेत्र प्रमुख जया माने, सभापती लीला घडशी, उपसभापती दीपाली दळवी-साळवी, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, जिल्हा परिषद सदस्य चंद्रकांत मणचेकर, पंचायत समिती सदस्य संजय नवाथे, मानसी आंबेकर, नगरसेवक सोनाली गुरव, पूर्वा मुळे, शहरप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत, उपनगराध्यक्षा यामिनी जोईल, माजी नगराध्यक्ष सुनील कुरुप, दिलीप पळसुळे-देसाई, राहुल शिंदे आदींसह अनेक शिवसैनिक उपस्थित होतेकारवाई कराचमनाई आदेश असताना भाजप कार्यकर्त्यांनी जमाव गोळा करून खासदारांना अवमानकारक शब्द उच्चारुन त्यांचा पुतळा दहन केला. या प्रकाराची चौकशी करून कारवाई करण्यात यावी, असे निवेदन तहसीलदार समाधान गायकवाड, पोलीस निरीक्षक अनिल गंभीर यांच्याकडे केली आहे.