शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
3
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
4
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
5
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
6
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
7
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
8
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
9
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
10
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
11
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
12
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा
13
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरण मिटले? हितेंद्र ठाकुरांसोबत एकत्र पत्रकार परिषद होती, पोलिसांनी रोखली
14
"महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता मत विकणार नाही’’, जयंत पाटील यांचा भाजपाला टोला   
15
कर्तव्यनिष्ठेला सलाम! स्वतःच्या जीवाची पर्वा न करता नर्सने १५ बाळांचा आगीतून वाचवला जीव
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'अखेर भ्रष्टयुतीचा कारभार उघडा पडला, विनोद तावडेंवर कारवाई झाली पाहिजे'; नाना पटोलेंची मागणी
17
आईवरील उपचार थांबवून त्यांनी...; श्रीनिवास पवारांचा अजित पवारांवर मोठा आरोप
18
घसरत्या बाजारात कुठे गुंतवणूक कराताहेत Mutual Fund हाऊस, कोणते आहेत ३ महिन्यांतील टॉप शेअर्स?
19
एक विवाह ऐसा भी! ११ रोपं आणि १ रुपया घेऊन नवरदेवाने बांधली लग्नगाठ; म्हणाला...
20
गौरी महालक्ष्मी योग: ७ राशींना भरपूर लाभ, शेअर बाजारातून नफा; उत्पन्न वाढेल, सुख-वैभव काळ!

शिवसेनेची खेळी, स्थानिक भाजपला संजीवनी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2021 4:33 AM

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : शिवसेनेने कोणत्याही उद्देशाने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक केली असली तरी ही अटक, त्यासाठी झालेले आंदाेलन या साऱ्यातून स्थानिक भाजपला मोठा फायदा होण्याची शक्यता आहे. आतापर्यंत जिल्ह्यात बलाढ्य असलेल्या शिवसेनेला सामोरे जाण्याचे धाडस भाजपमध्ये नव्हते. मात्र आता अटकेच्या प्रकारानंतर भाजपही शिवसेनेला आक्रमकपणे तोंड देण्यास सज्ज झाला आहे. या कारवाईमुळे दुखावले गेलेले नारायण राणे आता अधिक आक्रमकपणे वाटचाल करतील, अशी शक्यता असल्याने भाजप कार्यकर्त्यांचा उत्साह अधिक वाढला आहे.

मंगळवारचा दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी वेगळाच होता. सकाळी सात, साडेसात वाजल्यापासूनच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला असल्याची चर्चा सुरू झाली. त्यापाठोपाठच कोणत्याही क्षणी राणे यांना अटक केली जाण्याची शक्यताही वर्तवली जाऊ लागली. त्यामुळे वातावरण एक प्रकारचा तणाव आला. कोणत्याही क्षणी काहीही घडू शकते, असे चित्र तयार होऊ लागले. हे शिवसेना विरुद्ध नारायण राणे अशाच लढाईचे चित्र होते. त्यामुळे काहीतरी घडणार, अशी शक्यता तयार झाली.

या साऱ्याची ठिणगी प्रथम चिपळुणात पडली. चिपळुणात शिवसेनेने राणे यांच्याविरोधात घोषणा दिल्या. एरवी शिवसेनेच्या आंदोलनाला दुसरी बाजू नसते. शिवसेनेचे आंदोलन एकतर्फी होते. मात्र यावेळी शिवसेनेच्या घोषणाबाजीला माजी खासदार नीलेश राणे सामोरे गेले. चिपळुणात प्रथम या दोन पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले. निदर्शने करणाऱ्यांना आवरा, असे नीलेश राणे आक्रमकपणे पोलिसांना सांगत होते. त्यामुळे अशा आंदोलनात मागे असणारे भाजपचे कार्यकर्ते तेवढ्याच त्वेषाने पुढे आले. चिपळूणनंतर आरवलीमध्येही शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. तेथेही भाजप कार्यकर्ते मागे न हटता आक्रमकपणे पुढे आले.

भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमक होण्याची वेळ याआधी आली नव्हती. आता नारायण राणे, नीलेश राणे पाठीशी असल्याने भाजप कार्यकर्ते शिवसेनेला उत्तर देण्यासाठी तेवढ्याच आवेशाने पुढे झाले, हा भाजपसाठी मोठा बदल आहे. ही मानसिकता भाजपच्या नव्या पिढीतील कार्यकर्त्यांना मोठे बळ देणारी आहे.

....................

आजवर भाजप दबलेलाच

ज्यावेळी शिवसेना आणि भाजप यांची युती होती, तेव्हाही शिवसेनेच्या बलाढ्य ताकदीमुळे भाजप कायम दबलेलाच पक्ष होता. आधी जिल्ह्यात विधानसभेच्या सात जागा असताना भाजपला फक्त दोन जागा होत्या. नंतर त्या पाच जागा झाल्यानंतर भाजपच्या वाट्याला एकच जागा आली. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही युती असली तरी शिवसेनेचे संख्याबळ मोठे असल्याने नेहमीच शिवसेनेने भाजपला पद देताना दुजाभाव दाखवला होता. त्यामुळे भाजप केवळ शिवसेनेच्या मागून फरपटत जात होता.

...............

युती तुटली, भाजप खोलातच

शिवसेनेशी असलेली युती तुटल्यानंतर भाजप अधिकच खोलात गेली. भाजपची स्वत:ची मते कायम असली तरी ती निवडून येण्यासाठी पुरेशी नव्हती. त्यामुळे भाजप कार्यकर्त्यांची मानसिक स्थिती कायमच पराभूताची होती. शिवसेनेची साथ सुटल्यानंतर भाजपला स्थानिक स्वराज्य संस्थांमध्येही मोठे यश मिळाले नाही. मात्र आता नारायण राणे भाजपमध्ये आल्याने आणि विशेषत: मंगळवारच्या घटनेमुळे भाजप कार्यकर्त्यांच्या या मानसिकतेत बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

..............

थोड्याचवेळात नवे फलक

मंगळवारी सकाळच्या सत्रात शिवसेनेने आक्रमकपणे आंदोलन सुरू केले. रत्नागिरी शहरातही त्याचे पडसाद उमटले. मारुतीमंदिर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी भाजपच्या जनआशीर्वाद यात्रेचे फलक फाडले. एरवी भाजपचे कार्यकर्ते अशा घटनेनंतर निषेध करुन शांत राहिले असते. मात्र हे फलक फाडल्यानंतर काही वेळातच भाजपच्या कार्यकर्त्यांनी नवे फलक लावले. भाजप कार्यकर्त्यांची ही बदललेली मानसिकता शिवसेनेच्या आंदोलनामुळेच पुढे आली आहे.