दापोली : आमदार योगेश कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका संघटक उन्मेष राजे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना दापोली तालुका कार्यालयात ‘माझी रत्नागिरी, माझी जबाबदारी’ अभियानांतर्गत ‘कोरोना मुक्त माझी, दापोली माझी जबाबदारी’ या माेहिमेचा शुभारंभ करण्यात आला. या सर्वेक्षणाच्या कामात शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी हाेणार आहेत.
शहरातील आणि ग्रामीण भागात प्रत्येक घरोघरी जाऊन नागरिकांची ऑक्सिजन पातळी तपासणे व इतर कोरोना सदृश्य लक्षणे तपासणी करणे या कामात शिवसेनेचे कार्यकर्ते स्वयंस्फूर्तीने दापोली नगरपंचायतीच्या सोबत सहभागी हाेणार आहेत.
यावेळी कृषी व पशुसंवर्धन सभापती रेश्मा झगडे, नगराध्यक्षा परवीन शेख, युवासेना तालुका अधिकारी सुमित जाधव, शहर प्रमुख राजेंद्र पेटकर, युवासेना शहर अधिकारी बाबू पारकर, सुकोंडी सरपंच भरत हुमणे, बांधतिवरे सरपंच सुदेश डाकवे, सर्व नगरसेवक, शिवसेना व युवासेना पदाधिकारी उपस्थित होते.