शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

आदिष्टी, शिरगावने पटकावला शिवगर्जना चषक

By admin | Published: March 29, 2016 10:37 PM

जयगणेश, गुरूमळी द्वितीय : कुवारबाव येथे कार्यक्रम; होम मिनिस्टरमध्ये दीक्षा चव्हाण पैठणीच्या मानकरी

रत्नागिरी : श्री जयभैरी मित्रमंडळ, मिरजोळे - कुवारबाव यांच्यावतीने घेण्यात आलेल्या ढोलवादन स्पर्धेत आदिष्टी, शिरगाव संघाने बाजी मारत शिवगर्जना चषक पटकावला. मंडळाचे अध्यक्ष व मिरजोळेचे सरपंच राजेश तोडणकर यांच्या हस्ते शिवछत्रपतींच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. यावेळी आंबा व्यापारी सुधाकर सुर्वे, व्यावसायिक स्वप्नील सुर्वे उपस्थित होते. महिलांसाठी होम मिनीस्टर स्पर्धाही यावेळी घेण्यात आली. या स्पर्धेत दीक्षा दिनेश चव्हाण या पैठणीच्या मानकरी ठरल्या. यामध्ये द्वितीय क्रमांक प्रिया राजेंद्र ठीक यांनी पटकावला.सायंकाळच्या वेळेत शिवकालीन मर्दानी खेळांचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. हातखंबा (तारवेवाडी) येथील मंडळाने अनेक मर्दानी खेळ व शिवकालीन लढाईचे प्रात्यक्षिक दाखवून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली.ढोलवादन स्पर्धेत आदिष्टी, शिरगाव या संघाने मंडळाचा शिवगर्जना चषक व रोख रक्कम ७,७७७ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. द्वितीय क्रमांक जयगणेश, गुरुमळी यांना ५,५५५ रुपये व चषक, तृतीय क्रमांक ओम साई, चाळकेवाडी यांना ३,३३३ रुपये व चषक देऊन गौरविण्यात आले. उत्तेजनार्थ चषक महालक्ष्मी, काजरघाटी संघाला देण्यात आला. उत्कृष्ट ताशावादक सुशील मालगुंडकर, दुर्गा पथक सोमेश्वर, उत्कृष्ट ढोलवादक श्रेयस कीर, जाकादेवी - रनपार यांना गौरविण्यात आले.उत्कृष्ट वेशभूषा जयगणेश मित्रमंडळ, गुरुमळी, शिस्तबद्ध संघ सांब रवळनाथ, चिंचखरी यांना गौरवण्यात आले. तसेच या स्पर्धेत वैशिष्ट्यपूर्ण ठरलेल्या महिलांचा त्रिमूर्ती नवतरुणी, कोळंबे संघाला चषक व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले.शिवाय काजरघाटी येथील अवघ्या १० ते १२ वर्षांखालील मुलांच्या संघाने मोठमोठे ढोल वाजवून उपस्थित प्रेक्षकांची मने जिंकली. त्यांनासुद्धा मंडळाच्यावतीने सन्मानचिन्ह व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. या स्पर्धेसाठी पंच म्हणून संदीप पावसकर यांनी काम पाहिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष राजेश तोडणकर व शिवसेना शाखाप्रमुख सूरज मालगुंडकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जयभैरी मित्रमंडळ, मिरजोळे - कुवारबावच्या सर्व सभासदांनी मेहनत घेतली. ओंकार बंडबे यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)