पावस : छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचे औचित्य साधून रत्नागिरी तालुक्यातील जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शाळा, पावस नं. १ शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्रभेटअंतर्गत जवळील पूर्णगड किल्ल्याला भेट दिली. विद्यार्थ्यांनी पूर्णगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.यावेळी मुलांनी किल्ल्यावर फेरफटका मारून किल्ल्याच्या परिसराचे निरीक्षण केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याची आणि गड किल्ल्यांची ओळख व्हावी, तसेच गड किल्ल्यांचे संवर्धन कसे करावे, हा प्रमुख हेतू या भेटीमध्ये होता. मुलांनी अतिशय उत्साहाने सदर उपक्रमात भाग घेऊन खऱ्या अर्थाने शिवजयंती साजरी केली.
यावेळी मानसी कुबडे, साक्षी कदम, गंभीरानंद मदने, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष अभिजीत डोंगरे, उपाध्यक्ष सुधीर देवळेकर, पालक व शिवभक्त उपस्थित होते.