लांजा : शहरातील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील मराठी विभागाने न्यू एज्युकेशन सोसायटीचे अमृत महोत्सवी वर्ष व लांजा महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यस्तरीय ऑनलाईन पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला असून, कल्याण येथील श्रद्धा वझे यांनी प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.
गेल्या वर्षी कोरोनामुळे लॉकडाऊन सुरू झाल्यापासून लांजा महाविद्यालयातील मराठी विभागाने पत्र लेखन स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष आहे. या वर्षीही या स्पर्धेत महाराष्ट्राच्या विविध भागातून पत्र लेखकांनी सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचे संयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. महेश बावधनकर यांनी केले होते.
स्पर्धेतील सर्व विजेत्यांचे व सहभागी स्पर्धकांचे अभिनंदन न्यू एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष जयवंत शेट्ये, उपाध्यक्ष सुनील कुरूप, सचिव विजय खवळे, सर्व पदाधिकारी, मराठी विभाग प्रमुख डॉ. महेश बावधनकर, प्रा. सचिन गिजबिले, उपप्राचार्य डॉ. के.आर. चव्हाण व प्राचार्य डॉ. अरविंद कुळकर्णी यांनी केले आहे
.................
स्पर्धेचा निकाल
प्रथम : श्रद्धा वझे, कल्याण, द्वितीय : सिद्धी राजेंद्र परब, सिंधुदुर्ग, तृतीय : अंजली संतोष पिलणकर, रत्नागिरी, उत्तेजनार्थ : डॉ. अरुणा फिरोदिया, सातारा, मंजुश्री भागवत, देवरूख, प्रेमला अरुण बराटे, पुणे व सिमरन कलंदर शेख, लांजा. विजेत्या तीन क्रमांकांना अनुक्रमे रु. १०००, रु. ७५०, रु. ५०० व उत्तेजनार्थ प्रत्येकी रु. २५० व प्रमाणपत्र दिले जाणार आहे. सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने वितरित करण्यात आली आहेत.