शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
2
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
3
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
4
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
5
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
6
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
7
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
8
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
9
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
10
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
11
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
12
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
13
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
14
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
15
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
16
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
17
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक
18
मुंबईतल्या 'या' १४ जागांवर भाजपाचे उमेदवार ठरले; ३ विद्यमान आमदार प्रतिक्षेत 
19
ज्योती मेटे यांचा शरद पवार गटात प्रवेश, विधानसभा निवडणूक लढवण्याबाबत म्हणाल्या...
20
महिलेशी मैत्री, हॉटेलमध्ये भेटायला बोलावलं अन्...; कसा पकडला गेला शार्प शूटर सुक्खा?

Ratnagiri: चिपळूणमध्ये एटीएसकडून सहाजण ताब्यात; अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2024 12:05 PM

चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश ...

चिपळूण : दहशतवाद विरोधी पथकाने तालुक्यातील सावर्डे येथे ६ जणांना ताब्यात घेतले आहे. त्यामध्ये कर्नाटक येथील पाच जणांचा समावेश आहे. अतिरेकी संघटनांना पैसे पुरवल्याचा आरोप या संशयितांवर आहे. बुधवारी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येते.सावर्डे विभागात दोन दिवस दहशतवादविरोधी पथक तळ ठोकून होते. या पथकाने सावर्डे बाजारपेठेलगतच्या एका विभागातून संबंधित तरुणाला ताब्यात घेतले. त्याच्यासोबत कर्नाटकमधील पाच जणांनाही चौकशीसाठी मुंबईला नेण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभर या कारवाईत हे पथक गुंतले होते. त्यानंतर बुधवारी सावर्डे येथील तरुण हाती लागताच हे पथक मुंबईकडे रवाना झाले. मात्र, या पथकाने स्थानिक पोलिसांना या घटनेचा सुगावा लावून दिला नाही. त्यामुळे या प्रकाराविषयी स्थानिक पोलिसांना फारशी माहिती नाही.संबंधित स्थानिक तरुणाने मुंबई येथे हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला असून तेथेच त्याची कर्नाटकमधील पाच जणांशी ओळख झाली असावी, अशी चर्चा आहे. याविषयी सावर्डे पोलिसांकडे अधिकृतपणे कोणतीही माहिती उपलब्ध नसली, तरी संबंधित कारवाईला दुजोरा देण्यात येत आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीChiplunचिपळुणAnti Terrorist Squadएटीएसterroristदहशतवादी