रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे. कशेडीकडून पोलादपूरच्या दिशेने पावणेदोन किलोमीटर अंतराचा हा बोगदा होणार असून, त्यातील कशेडीपासून पुढे ३०० मीटरपर्यंत लांब असणाऱ्या या बोगद्याचे काम पूर्ण झाले आहे, तर पोलादपूरच्या दिशेनेही बोगद्याचे काम सुरू आहे. रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणाऱ्या या बोगद्यामुळे खेड ते पोलादपूर हे १ तासांचे अंतर आता अवघ्या १० ते १५ मिनिटांवर येणार आहे.दोन वर्षांपासून मुंबई - गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. त्याचवेळी कशेडी घाटाच्या पायथ्यापासून रायगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुका हद्दीतील भोगाव गावापर्यंत दोन्ही बाजूने बोगद्याचे काम सुरू आहे. येत्या १८ महिन्यांमध्ये दोन्ही बाजूचे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबई-गोवा प्रवासाचे अंतर कमी होणार असून वेळही १ तासाने कमी होणार आहे. खेड कशेडी येथे काम सुरू असलेल्या बोगद्यामध्ये जाण्या-येण्यासाठी प्रत्येकी ३ याप्रमाणे ६ मार्गिका तयार केल्या जात आहेत.काम पूर्ण होऊन या बोगद्यामधून वाहतूक सुरू झाल्यानंतर काही समस्या उद्भवण्याची शक्यता लक्षात घेऊन आपत्कालीन व्यवस्थाही तयार केली जाणार आहे. केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली बोगद्याचे काम सुरू आहे. विशेष म्हणजे या बोगद्यात एखाद्या वाहनाला मधूनच पुन्हा परत फिरायचे असेल तर तशी किंवा बंद पडलेले वाहन हलविण्याचीही व्यवस्था तेथे केली जाणार आहे.पुलांच्या कामाला वेग आवश्यकमहामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम रत्नागिरीतील दोन टप्पे वगळता अन्यत्र टप्प्यांमध्ये जोरात सुरू आहे. काही ठिकाणी अडथळे आलेले असले तरी त्यातून मार्ग काढण्याचा प्रयत्नही राष्ट्रीय महामार्ग विभागाकडून केला जात आहे. मात्र, आरवली ते वाकेड या ९१ किलोमीटर लांबीच्या दोन टप्प्यांचे काम केवळ १० ते २० टक्के एवढेच झालेले आहे. महामार्गावरील अर्धवट स्थितीत असलेल्या १४ पुलांच्या कामाला आता महामार्ग विभागाला वेग द्यावा लागणार आहे.
कशेडी बोगद्यात होणार सहा मार्गिका; - आपत्कालिन व्यवस्थाही उभारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2020 11:47 AM
रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याचे काम वेगात सुरू आहे. कशेडीकडून पोलादपूरच्या दिशेने पावणेदोन ...
ठळक मुद्दे - महामार्ग चौपदरीकरण