रत्नागिरी : तालुक्यातील साखरतर येथी कोरोनाबाधीत महिलेचे नातेवाईक असलेले सहा महिन्याचे बाळ कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल प्राप्त झाला आहे. त्याची प्रकृती स्थित असून, घाबरण्यासारखी स्थिती नसल्याची माहिती जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली आहे.
रत्नागिरीनजीकच्या साखरतर गावातील एका महिलेला कोरोना झाला असल्याचे ७ एप्रिल रोजी निष्पन्न झाले. त्यानंतर त्या महिलेच्या संपर्कात आलेल्या तिच्या एका नातेवाईक महिलेला कोरोना असल्याचे पुढच्या दोनच दिवसात स्पष्ट झाले. त्यांच्या कुटुंबातील सर्वांचेच नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले होते.
सोमवारी रात्री उशिरा काही नमुन्यांचे अहवाल जिल्हा रूग्णालयाला प्राप्त झाले. त्यानुसार कोरोनाबाधीत महिलेचा नातेवाईक असलेल्या सहा महिन्याच्या एका बाळाला कोरोना झाला आहे.या बाळाच्या आईचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. मात्र हे बाळ कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आला आहे. त्याचे नमुने पुन्हा तपासणीसाठी पाठवले जाणार असल्याचे समजते.
घाबरून जाऊ नये : मिश्रासहा महिन्याचे बाळ कोरोनाबाधीत असल्याचा अहवाल आला आहे. मात्र कोणीही घाबरून जाऊ नये. या बाळाची प्रकृती स्थितर आहे. मुलांचे तज्ज्ञ त्यांच्यावर उपचार करत आहेत.लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हाधिकारी, रत्नागिरी