रत्नागिरी : परिचारिकांचे प्रश्न शासकीय पातळीवर नेण्यासाठी आपण सर्वतोपरी मदत करू, असे आश्वासन मुंबईच्या माजी महापाैर स्नेहल आंबेकर यांनी दिले़ यावेळी त्यांनी परिचारिकांच्या कार्याबद्दल अतिशय सह्रदय गौरवोद्गार काढले़
परिचारिकेचा वेल्फेअर मंच आयोजित ‘आशा ..एक मनोरंजनात्मक’ या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून मुंबईच्या माजी महापौर स्नेहल आंबेकर यांना आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी त्या बाेलत हाेत्या़ यावेळी प्रसिद्ध कलाकार आणि रेडिओ जॉकी संदीप लोखंडे म्हणाले की, परिचारिकांना या कोरोना काळामध्ये सतत तणावाखाली काम करावे लागत आहे़ त्यासाठी त्यांना मनोरंजन आणि मोटिव्हेशनसाठी आशा.. एक मनोरंजनात्मक मोटीवेशनल कार्यक्रम स्वतः सादर करण्याची जबाबदारी घेतली. मुंबईच्या बॉम्बे पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलच्या ज्येष्ठ परिचारिका पूर्वा आंबेकर यांनी सांगितले की, माजी महापौर स्नेहल आंबेकर यांनी महापौर काळामध्ये अनेक आंतरराष्ट्रीय दौरे केल्यानंतर त्यांनी महिलांसाठी अनेक वेल्फेअरचे कार्यक्रम राबवल्याचे सांगितले़
गडहिंग्लज येथील माजी प्राचार्य आणि ज्येष्ठ समाजशास्त्रज्ञ डॉ. प्रभाकर द्राक्षे यांनी या मंचाच्या माध्यमातून परिचारिका संघटनसाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले़ चर्चेमध्ये विलास साडविलकर हे सहभागी झाले हाेते़ परिचारिका संघटनेच्या अध्यक्षा स्नेहा बने यांनी या मंचाची स्थापना केल्याबद्दल समाधान व्यक्त केले़ महाराष्ट्रातून जवळजवळ ४८ परिचारिका ऑनलाईन उपस्थित होत्या़ दर महिन्याला परिचारिका वेल्फेअर मंचाचे कार्यक्रम करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.