उद्धव ठाकरे यांचा तोल आता एवढा खाली गेला आहे की, ते काहीही बडबडत आहेत. ते पंतप्रधानांना वाटेल ते बोलतायत, अमित शहांना वाटेल ते बोलतायत, मुख्यमंत्र्यांनाही वाटेल ते बोलतायत. मला एक कळत नाही, ज्यावेळेला नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासंदर्भात वक्तव्य केले होते की, मी असतो तर कानाखाली मारली असती. त्यांना जेवणावरून उचलून आत टाकले होते. मग उद्धव ठाकरे यांच्यावर एफआयआर का दाखल होत नाही? त्यांना आत का टाकत नाही, याचे गणित मला कळत नाही? असा सवाल शिवसेना शिंदे गटाचे नते रामदास कदम यांनी केला आहे. ते रत्नागिरीत पत्रकारांसोबत बोलत होते.
कदम म्हणाले, "ते (उद्धव ठाकरे) मुख्यमंत्र्यांनाच बूट चाटायला जातो, हा अमुक चाटतो, तमुक चाटतो. इतक्या खालच्या पातळीवरती जो माणूस जाऊन बोलतोय, त्यांचा तोल गेलेले आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांवर बोलणे, म्हणजे हा राज्याचा अवमान आहे, महाराष्ट्र जनतेचा अवमान आहे. हे काही बिहार नाही ना? हा महाराष्ट्र आहे, सुसंस्कृत महाराष्ट्र आहे." ...बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत -कदम पुढे म्हणाले, "उद्धव ठाकरे बाळासाहेबांची स्टाईल मारायला जात आहेत. आता मी बघितले की, हातामध्ये रुद्राक्ष बांधलेत काय, जणू काही मी बाळासाहेब आहेत? अरे बाळासाहेबांच्या नखाचीही आपल्याला सर येणार नाही. कुठे बाळासाहेब आणि कुठे तुम्ही आहात? बाळासाहेब शब्दाला पक्के होते, तुम्ही तर बाळासाहेबांच्या विचाराशी बेईमानी करत आहात."
आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी -"एकंदा संपूर्ण रणधुमाळी बघितली, तर उद्धव ठाकरेंचा तोल गेलेला आपल्याला बघायला मिळतो. वाटेल ते बडबडायचे, वाटेल ते आरोप करायचे, गुजरातच्या बाबतीमध्ये अधिक बोलायचे, अमित शहांवर बोलायचे, मुख्यमंत्र्यांवर बोलायचे. मग देवा भाऊ काय? जॉकेटवाला भाऊ काय? दाढीवाला भाऊ काय? तुम्हाला शोधत का हे? मग तुम्हाला कडका भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? तुमच्या मुलाला लफडेवाला भाऊ म्हटले तर चालेल का कुणी? आपण काय बोलतोय याचे भाण ठेवायला हवे सर्वांनी. हे अशोभनीय आहे, असं म्हणेन मी. खरेतर याच्यावरती गुन्हा दाखल व्हायला हवा होता. त्यांना जेलमध्ये टाकायला हवे होता, असे माझे प्रामाणिक मत आहे." असेही रामदास कदम यांनी म्हटले आहे.