रत्नागिरी : जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी अनुदानित वसतिगृहातील १३५ कर्मचाऱ्यांना वेळेवर मानधन मिळावे, असा निर्णय घेऊन त्या कर्मचाऱ्यांना न्याय दिला आहे.
जिल्ह्यात २९ अनुदानित वसतिगृह आहेत. त्यामध्ये सुमारे १३५ कर्मचारी मानधनावर भरले जाता. परंतु त्यांचे मानधन तीन महिने किंवा सहा महिन्यांनी मिळत होते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांना कुटुंब चालविताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. ही बाब त्या कर्मचाऱ्यांनी समाजकल्याण सभापती कदम यांच्या लक्षात आणून दिली. कदम यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष विक्रांत जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. इंदुराणी जाखड, उपाध्यक्ष उदय बने आणि समाजकल्याण समितीचे सर्व सदस्य यांच्या सहकार्याने जुलैपासून त्यांचे मानधन दरमहा करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. सभापती कदम यांनी घेतलेल्या निर्णयाचे त्या कर्मचाऱ्यांनी आभार व्यक्त करण्यात येत आहे.