लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण
: जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयातर्फे ‘इम्पॅक्ट २०२१’ या राष्ट्रीय स्तरावरील सॉफ्टवेअर स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत डी. बी. जे. महाविद्यालयाच्या माहिती व
तंत्रज्ञान विभागातील विद्यार्थ्यांनी आपल्या संकल्पनेतून ६ संगणक प्रकल्प
सादर केले. या स्पर्धेत सर्वाधिक पारितोषिके
मिळवत मानाचा समजला जाणारा फिरता चषक महाविद्यालयाने
पटकावत हॅटट्रिक साधली आहे.
दोन प्रवर्गांमध्ये ही स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्यातील पदवी
विभागात बी. एस. सी. आय. टी.च्या रसिका प्रमोद शिर्के आणि ऋतुजा
राजेंद्र बिडवाडकर यांच्या ‘मल्टीपर्पज टेक्नॉलॉजिकल मशीन इन ॲग्रिकल्चर’ या
प्रकल्पाला प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले. तसेच दानिश जैनुद्दीन देसाई व अमित आप्पासाहेब वाघमारे यांच्या ‘इम्युन वोटिंग सिस्टीम’ या
प्रकल्पाला तृतीय पारितोषिकाने गौरविण्यात आले. एम. एस. सी. आय. टी. च्या विद्या गणेश आग्रे हिच्या ‘स्मार्ट बेबी केअर सिस्टीम’ या प्रकल्पाला
पदव्युत्तर विभागात प्रथम पारितोषिकाने गौरविण्यात आले.
या प्रकल्पाद्वारे डी. बी. जे. महाविद्यालयाने विद्यार्थ्यांच्या
कौशल्याला वाव देऊन, प्रकल्प राबवून सकारात्मक पावले उचलली आहेत.
विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या प्रकल्पांना प्रोत्साहन देऊन अशा
प्रकल्पांचे स्वामीत्व हक्क मिळवून देण्याच्या या उद्देशाने प्रकल्प
साकारण्यात आले आहेत. या विद्यार्थ्यांना प्रा. संजय शिंदे, प्रा. अमित
शेवडे, प्रा. सई सुर्वे, प्रा. वैदेही गोंजारे यांचे मार्गदर्शन लाभले.
माहिती व तंत्रज्ञान विभागाच्या या यशाबद्दल नवकोंकण एज्युकेशन
सोसायटीचे अध्यक्ष श्रीधर भिडे, अध्यक्ष मंगेश तांबे, उपाध्यक्ष जीवन
रेळेकर, इतर सदस्य तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. श्रीकृष्ण बाळ,
उपप्राचार्य डॉ. संजय गव्हाळे, उपप्राचार्य डॉ. शफी चांदा, रजिस्ट्रार
नरेंद्र पेडामकर, माहिती व तंत्रज्ञान विभागप्रमुख प्रा. सुनील भादुले, प्रा. नेहा सुर्वे, प्रा. पूजा शिंदे यांनी अभिनंदन केले.