शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदे सरकारचे मोठे निर्णय; मुंबईत कारला टोलमुक्त प्रवेश अन्...; मध्यमवर्गीयांसह अनेकांना दिलासा, अंमलबजावणी सुरू
2
भाजपाची ५० उमेदवारांची पहिली यादी तयार; महायुतीत ५८ जागांवर चर्चा अद्याप बाकी
3
अखिलेश यादव महाराष्ट्रात, राष्ट्रवादी-ओवेसींच्या गडांना फटका बसणार; सपाचा हा आहे प्लॅन...
4
काँग्रेसच्या आमदाराने अजित पवारांच्या राष्ट्रवादीत केला प्रवेश, शिंदेंच्या शिवसेनेचं टेन्शन वाढलं!
5
आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभाचे योग, यश-कीर्ती; चांगल्या बातम्या मिळतील, शुभ दिवस
6
"...ज्यावरून मी त्याला कायम चिडवायचो"; अतुल परचुरेंच्या निधनाने राज ठाकरे झाले भावूक
7
भारताची कॅनडाविरोधात मोठी कारवाई! 6 उच्चायुक्तांची हकालपट्टी, 5 दिवसांत सोडावा लागणार देश
8
Mumbai Video: बापाने हात जोडले, मुलाला वाचण्यासाठी आई अंगावर पडली; पण ते मरेपर्यंत मारत राहिले
9
Atul Parchure Passed Away: 'वल्ली' अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरे यांचं निधन, काही वर्षांपूर्वीच कर्करोगावर केलेली मात
10
मोठी बातमी: राज्यपाल नियुक्त १२ जागांपैकी सरकारकडून ७ नावांवर शिक्कामोर्तब; कोणाकोणाला मिळाली संधी?
11
नववीपासूनची मैत्री...अतुल परचुरेंच्या निधनानंतर जयवंत वाडकर भावूक; शेअर केला शेवटचा फोटो
12
चतुरस्त्र अभिनेत्याची अकाली एक्झिट! अतुल परचुरेंच्या निधनानंतर CM एकनाथ शिंदेंसह राजकीय विश्वातून आदरांजली
13
"....तोपर्यंत हे म्हातारं काही थांबत नाही"; शरद पवारांचा निर्धार काय?
14
Pune Crime: पुण्यात तरुणीवर अत्याचार करणाऱ्या दुसऱ्या आरोपीच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; यूपीतून अटक!
15
कृष्णा महाराज शास्त्री भगवानगडाचे उत्तराधिकारी होणार; कधी बसणार गादीवर? जाणून घ्या...
16
उद्धव ठाकरेंवर अँजिऑप्लास्टी नाही, केवळ नियमित तपासणी; आदित्य ठाकरेंची माहिती
17
हरयाणा निकालातून घेतला धडा; महाराष्ट्रातील नेत्यांना काँग्रेस हायकमांडचे ३ आदेश
18
'४८ पैकी ३१ जागा जिंकल्यावर यांना लाडकी बहीण आठवली'; शरद पवारांचा महायुती सरकारला खोचक टोला
19
ठाकरेंना धक्का, टोपेंचं वाढलं टेन्शनl; 'शिवबंधन' तोंडत हिकमत उढाण शिंदेंच्या शिवसेनेत!
20
Acidity ने हैराण झालायत? वारंवार पोटात जळजळतं? 'हे' ५ उपाय करा, नक्की वाटेल 'रिलॅक्स'!

महाविकास आघाडीतील काही आमदार संपर्कात, प्रचिती लवकरच येईल; मंत्री उदय सामंतांचा गौप्यस्फोट

By मनोज मुळ्ये | Published: May 10, 2023 1:22 PM

आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल

रत्नागिरी : महाविकास आघाडीतील काही आमदार आपल्या संपर्कात आहेत. आपण जबाबदारीने हे बोलत आहोत आणि त्याची प्रचिती लवकरच महाराष्ट्राला येईल, असा गौप्यस्फोट राज्याचे उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केला.गेले काही दिवस महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्षांमध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे अंतर्गत पातळीवर आघाडीत बिघाडी झाली आहे. तीनही पक्ष एकत्र नसतील तर पुढच्या सर्व निवडणुका अवघड होतील, अशी भीती अनेकांच्या मनात आहे. त्यामुळेच मंत्री सामंत यांच्या दाव्याकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमधील लोक सध्या उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संपर्कात आहेत. लवकरच हा बदल राज्याला दिसेल. हे विधान आपण जबाबदारीने करत आहोत, असे ते म्हणाले.१७२ आमदार आमच्या पाठीशी आहेत. आम्ही आमची बाजू योग्य प्रकारे सर्वोच्च न्यायालयात मांडली आहे. त्यावर न्यायालय योग्य निर्णय देईल, असा आपल्याला विश्वास असल्याचे ते म्हणाले.माती परीक्षण लवकरच संपेलबारसूमधील माती परीक्षण अंतिम टप्प्यात आले आहे. तीन-चार दिवसात माती परीक्षणाच्या बोअर मारून पूर्ण होतील. त्यानंतर ही माती परीक्षणासाठी प्रयोगशाळेकडे पाठवली जाईल आणि प्रयोगशाळेचा अहवाल आल्यानंतरच प्रकल्पाबाबतचा निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले. बारसू येथील कातळशिल्प प्रकल्पामध्ये घेण्यासंदर्भात कुठलाही विचार नाही. ते शेतकऱ्यांकडेच राहील, त्यानंतर सरकार किंवा कंपनीच्या माध्यमातून ही कातळ शिल्प विकसित होतील, असेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंतMahavikas Aghadiमहाविकास आघाडी