लांजा : श्वानाला डॉक्टरकडे घेऊन गेलेला मुलगा व सून रात्री घरी न आल्याने, आईने लांजा पोलीस स्थानकात मुलगा-सून बेपत्ता झाल्याची फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतिभा प्रताप खानविलकर (५५, रा. बेनी बु. माळवाडी, सध्या रा. राजयोग पार्क, लांजा) या आपले पती, मुलगा प्रथमेश (२६) तसेच सून ऋतुजा (२४) असे भाड्याच्या खाेलीत राहतात़ दोन वर्षापूर्वीच मुलाचे लग्न झाले आहे. मुलगा प्रथमेश शुक्रवार दि. १८ जून रोजी सायंकाळी ७.३० वाजता पाळलेले श्वान घेऊन डाॅक्टरकडे गेला हाेता़ त्यावेळी सून ऋतुजाही त्याच्यासमवेत चारचाकी गाडी घेऊन गेले होते. त्यावेळी बहिणीचा फोन आल्याने प्रतिभा या बेडरूममध्ये गेल्या हाेत्या़ त्यावेळी बेडरूममधील कपाटातील कपडे पडलेले दिसले़ तसेच कपाटात ठेवलेले एटीएम व सोन्याची माळ दिसली नाही. त्यावेळी मुलगा व सून यांच्या मोबाईलवर फोन करण्याचा प्रयत्न केला असता, ते बंद आहेत.
नातेवाईक तसेच मुलाचे मित्र यांना फोन करून चाैकशी केली असता, त्यांचा पत्ता लागला नाही़ अखेर शनिवारी लांजा पोलीस स्थानकात येऊन प्रथमेशची आई प्रतिभा हिने मुलगा व सून बेपत्ता झाल्याची माहिती दिली़ अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत जाधव हे करीत आहेत़