जिल्हा परिषदेचे समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी रत्नागिरी शहरातील स्वामी विवेकानंद वसतिगृहाला भेट देऊन मुलांशी संवाद साधला.
लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : शहरातील झाडगाव येथील अनुदानित स्वामी विवेकानंद वसतिगृहाला जिल्हा परिषदेचे नूतन
समाजकल्याण सभापती परशुराम कदम यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी वसतिगृहातील
भोजन व्यवस्था तसेच इतर सोयीसुविधा यांचा आढावा घेतला.
वसतिगृहाची इमारत
विद्यार्थ्यांना राहण्यासाठी योग्य असून, वसतिगृहातील विद्यार्थ्यांची संख्याही नियमानुसारच असल्याचे दिसले. वसतिगृहात प्रथमोपचार पेटी असून, समिती गठीत करुन बोर्ड लावण्यात
आले आहेत. यावेळी त्यांनी अन्य बाबींचीही तपासणी केली. सध्या वसतिगृहात एक महिना पुरेल एवढा धान्यसाठा ठेवण्यात आला आहे. जेवणाचा दर्जा तपासून पाहिला असता विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे जेवण
दिले जात असल्याबाबत समाधान व्यक्त केले. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी
प्रत्यक्ष संवाद साधला. तसेच वसतिगृहाच्या अडीअडचणी असतील तर माझे सभापती म्हणून वेळोवेळी
सहकार्य राहील, असे परशुराम कदम यांनी सांगितले. भेटीच्या वेळी जिल्हा समाजकल्याण अधिकारी यतिन पुजारी तसेच समाजकल्याण
निरीक्षक ढेकणे उपस्थित होते.