अडरे : जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार गणेशोत्सवाच्या काळात येणारे गणेशभक्त व ग्रामस्थांसाठी चिपळूण तहसील कार्यालयासाठी सुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत २, ३ व ६ सप्टेंबर या कालावधीत खास गणेशोत्सव चावडी वाचन कार्यक्रम होणार आहे. त्यासाठी तहसीलदार वृषाली पाटील यांनी पुढाकार घेतला आहे.या चावडी वाचन कार्यक्रमात ग्रामस्थांना जमिनीसंदर्भातील आवश्यक माहिती देणे, त्यांच्या वारसांच्या हरकतींचे निरसन करणे यासंबंधीची कार्यवाही करण्यात येणार आहे. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१४ करिता मतदार जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. दि. २ सप्टेंबर रोजी मिरजोळी, गोवळकोट, भिले, कामथे, नागावे, कोंडफणसवणे, कोळकेवाडी, कान्हे, खडपोली, पिंपळी बुद्रुक, आकले, तिवरे, नांदिवसे, टेरव, मोरवणे, पाली, वालोपे, खरवते, डेरवण, फुरुस, शिरळ, भोम, कापरे, मालदोली, वीर, तुरंबव, ओमळी, गुढे, चिवेली, बामणोली, मिरवणे, तनाळी, कोकरे, नांदगाव, कुटरे अशा ३६ गावात चावडीवाचन होणार आहे.३ रोजी कोंढे, मजरेकाशी, कालुस्ते, कापसाळ, पोफळी, वेहेळे, मुंढेतर्फे चिपळूण, कादवड, रिक्टोली, स्वयंदेव, वेतकोंड, वालोटी, खांदाट, परशुराम, कळवंडे, कुडप, दुर्गेवाडी, मालघर, खोपड, पोसरे, करंबवणे, देवपाट, ढाकमोली, ताम्हणमळा, डुगवे, गोंधळे, वाघिवरे, पाथर्डी, उभळे, खेरशेत, नांदगाव खुर्द, तळवडे या ३२ गावात कार्यक्रम होणार आहे. ६ सप्टेंबर रोजी अडरे अनारी या गावात चावडीवाचन होणार आहे. शासनाचे उपक्रम जनतेच्या दारी जावे, या उद्देशाने चिपळूण तहसील कार्यालयाने हा उपक्रम राबविला आहे. यासाठी त्या त्या गावातील लोकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार वृषाली पाटील यांनी केले आहे. (वार्ताहर)तहसीलदार पाटील यांचा पुढाकारसुवर्ण जयंती राजस्व अभियानांतर्गत गणेशोत्सव कालावधीत गणेशभक्त व ग्रामस्थांसाठी खास चावडी वाचन कार्यक्रम होणार आहे. या चावडी वाचन कार्यक्रमात ग्रामस्थांना जमिनीसंदर्भातील आवश्यक माहिती देणे, त्यांच्या वारसांच्या हरकतींचे निरसन करणे, यासंबंधीची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेच मतदार जागृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
गणेशोत्सव काळात खास चावडीवाचन
By admin | Published: August 29, 2014 10:10 PM