शहरं
Join us  
Trending Stories
1
'काकींना विचारणार, नातवाचा पुळका का आलाय?'; अजित पवारांना शरद पवारांनी दिले उत्तर
2
मनसे उमेदवाराला पाहताच कट्टर शिवसैनिकाच्या पत्नीला अश्रू अनावर; वरळीत काय घडलं?
3
विधानसभा निवडणूक निकालानंतर सत्तेसोबत जाणार, प्रकाश आंबेडकरांचे मोठे संकेत
4
शाहिद कपूरच्या ५०० कोटींचा सिनेमा 'अश्वत्थामा'ला लागला ब्रेक! मोठं कारण आलं समोर
5
मुंबईतील २६/११ हल्ल्याचा मास्टरमाईंड बिनधास्त फिरतोय; पाकिस्तान जगाची दिशाभूल करतंय
6
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
7
हृदयद्रावक! ओव्हरटेक करताना क्रेटाची ऑटोला धडक; अपघातात वधू-वरांसह ७ जणांचा मृत्यू
8
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
9
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
10
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
11
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
12
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
13
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
14
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
15
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
16
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
17
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
18
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
19
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
20
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक

विशेष निराधार योजना ठरतायत आधार

By admin | Published: April 12, 2017 3:53 PM

रत्नागिरी जिल्ह्यात ४०११२ लाभार्थी, वर्षभरात २४ कोटी ३९ लाख रूपये अनुदानाचे वाटपमात्र, दापोलीत अपंग निवृत्तीवेतन योजनेचा एकही लाभार्थी नाही

आॅनलाईन लोकमतशोभना कांबळे/ रत्नागिरी, दि. १२निराधार व्यक्तिंना अर्थसहाय्य करणाऱ्या विशेष योजना प्रशासनाने पुरेशा प्रमाणात केलेल्या जागृतीमुळे ग्रामीण भागातील जनतेपर्यंत पोहोचल्या आहेत. या सर्व योजनांचा लाभ घेणाऱ्यांची संख्या ४० हजारपर्यंत गेली आहे. मात्र, दापोलीत यावर्षी इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा एकही लाभार्थी नाही. या विविध सहा योजनांसाठी वर्षभरात २४ कोटी ३९ लाख ८२ हजार ५७० एवढ्या अनुदानाचे वाटप जिल्ह्यातील ४०११२ लाभार्थ्यांना करण्यात आले आहे.विशेष योजनांतर्गत निराधार घटकांसाठी संजय गांधी निराधार योजना विभागातर्ये मासिक लाभाच्या योजना राबविण्यात येतात. त्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना या दोन राज्य सरकारच्या, तर इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजना आणि राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना या केंद्र सरकारतर्फे योजना राबविण्यात येतात. या योजनांतर्गत लाभार्थ्याला दरमहा ६०० रूपये अनुदान देण्यात येते, तर राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत कमावत्या व्यक्तिचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबाला किंवा त्याच्या वारसाला एकरकमी १०,००० रूपये इतके अर्थसहाय देण्यात येते.प्रशासनाच्या प्रयत्नांमुळे या सहा योजनांच्या लाभार्थी संख्येत वाढ झाली आहे. जिल्ह्यात संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्तिवेतन योजना यांचे लाभार्थी असले तरी यावर्षी दापोली तालुक्यात इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्तिवेतन योजनेचा एकही लाभार्थी आढळला नाही. त्यामुळे तालुक्यामध्ये या योजनेचे लाभार्थीच नाही की, योजना पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचत नाही, असा सवालही केला जात आहे. लाभार्थ्यांना शासनाच्या योजनांचा लाभ मिळावा म्हणून शासन स्तरावर प्रयत्न होत आहेत. मात्र, स्थानिक प्रतिनिधींनीही यासाठी प्रयत्न केल्यास या योजना गरजूंपर्यंत अधिक पोहोचतील, असे म्हटले जात आहे. त्यातच काही वेळा अपंगत्त्वाच्या दाखल्यासाठी खेटे मारावे लागत असल्यानेही या योजनेचा लाभ घेताना मर्यादा येत आहेत. असं असलं तरीही यावर्षी या योजनेला दापोलीवगळता इतर आठ तालुक्यांमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला आहे. शासनाने या विशेष योजना ग्रामीण भागात पोहोचण्यासाठी ‘जगणं’ नावाची पुस्तिका प्रसिद्ध केली आहे. ही पुस्तिका अगदी ग्रामपंचायत स्तरावरही उपलब्ध आहेत. त्यामुळे आता या सहाही योजनांना या आर्थिक वर्षात जिल्ह्यात चांगलाच प्रतिसाद लाभला आहे. मंडणगड तसेच दापोली येथे गत आर्थिक वर्षात अपंग निवृत्तिवेतन योजनेचा तसेच विधवा निवृत्तिवेतन योजनेचा एकही लाभार्थी नव्हता. मात्र, यावर्षी मंडणगडमध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांनी लाभ घेतला आहे. मात्र, दापोली तालुक्यात अपंग निवृत्ती वेतन योजनेचा एकही लाभार्थी नाही.एकूण लाभार्थी संख्या

संजय गांधी अनुदान - १४७५३श्रावणबाळ निवृत्तीवेतन - १५४४०वृद्धापकाळ निवृत्तीवेतन - ९५२३राष्ट्रीय कुटुंब लाभ - १४७विधवा निवृत्तीवेतन - १११८अपंग निवृत्तीवेतन - १३८