रत्नागिरी : कोरोना परिस्थिती लक्षात घेता प्रवाशांची मागणी कमी झाल्यामुळे कोकण रेल्वेमार्गावरील काही विशेष गाड्या आज, २९ एप्रिलपासून तात्पुरत्या रद्द करण्यात आल्या आहेत, असे कोकण रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले आहे.
गाडी क्र. ०२४१४ एच. निजामुद्दीन - मडगाव जं. राजधानी सुपरफास्ट द्वि - साप्ताहिक विशेष गाडी पुढील आदेश येइपर्यंत ३० एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्र. ०२४१३ मडगाव जं. - एच. निजामुद्दीन राजधानी सुपरफास्ट द्वि - साप्ताहिक विशेष गाडी २ मेपासून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्र. ०२१२० करमाळी - मुंबई सीएसएमटी तेजस सुपरफास्ट स्पेशल गाडी २८ एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. गाडी क्रमांक ०२११९ मुंबई सीएसएमटी - करमाळी तेजस सुपरफास्ट स्पेशल तसेच गाडी क्रमांक ०२६२० मंगळुरू मध्यवर्ती - लोकमान्य टिळक (टी) डेली सुपरफास्ट स्पेशल गाडी, ट्रेन क्रमांक ०७१०७ मडगाव जं. - मंगळुरू सेंट्रल रिझर्व्ड एक्स्प्रेस विशेष गाडी आणि ०७१०८ मंगळुरू मध्य - मडगाव जं. राखीव एक्स्प्रेस विशेष गाडी २९ एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे. तसेच ०२६१९ लोकमान्य टिळक (टी) - मंगळुरू सेंट्रल डेली सुपरफास्ट स्पेशल गाडी ३० एप्रिलपासून रद्द करण्यात आली आहे.
प्रवाशांनी या बदलाची नोंद घ्यावी, असे काेकण रेल्वे प्रशासनाकडून कळविण्यात आले असून, होणाऱ्या गैरसाेयीबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यात आली आहे.