टेंभ्ये : येथील कै. बा. रा. नागवेकर तथा हातीसकर मास्तर माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात ७५ वा स्वातंत्र्यदिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात आला. अमृत महोत्सव सोहळ्याला कोरोना प्रतिबंधक नियमावलीमुळे विद्यार्थ्यांची अनुपस्थिती प्रकर्षाने जाणवत होती. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष उत्तम नागवेकर होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेचे सचिव राजाभाऊ साळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर उपस्थित संस्था पदाधिकारी, अध्यापक व माजी विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, ध्वजगीत व परिपाठ सादर केला. संस्थाध्यक्ष उत्तम नागवेकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्याध्यक्ष अनंतराव साळवी, खजिनदार रामचंद्र शिंदे, संस्था सदस्य श्रीकृष्ण साळवी, आशाताई साळवी, सदस्य व अध्यापक योगेश साळवी, मुख्याध्यापिका एस. ए. उरुनकर व सर्व शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अध्यापक संदीप शिरसाट यांनी केले.