संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आराेग्य केंद्राला भेट देऊन सरपंच बापू शेट्ये यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सत्कार केला. (छाया : संताेष पाेटफाेडे)
लोकमत न्यूज नेटवर्क
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील साखरपा प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड लसीकरणाला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. दररोज सरासरी नव्वद ते शंभर लोकांना लस दिली जात आहे.
वैद्यकीय अधिकारी डॉ. पोपट अदाते, डॉ. उमा त्रिभुवणे, आरोग्य सहाय्यक दत्तात्रय भस्मे यांच्यासह सर्वच आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे. त्यांच्या योगदानाची दखल व जनतेचा लसीकरणाला मिळालेला उत्तम प्रतिसाद या सर्वांची दखल कोंडगाव ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच बापू शेट्ये यांनी घेतली. त्यांनी प्राथमिक आरोग्य केंद्राला भेट देऊन वैद्यकीय अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांची पाठ थोपटून त्यांच्या योगदानाबद्दल कौतुक केले. सरपंच बापू शेट्ये यांनी केलेल्या कौतुकामुळे अधिक काम करण्याचे बळ मिळाले असून, अधिकाधिक चांगली व उत्तम आरोग्य सेवा देण्यास प्रेरणा मिळाल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.