शहरं
Join us  
Trending Stories
1
'एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह' ! महिला सुरक्षेसाठी अजित पवारांचा 'पंचशक्ती' निर्णय
2
मविआच्या जागावाटपात संजय राऊतांसोबत वाद?; नाना पटोलेंनी सगळंच सांगितलं
3
Iran-Isreal तणावात गुंतवणूकदारांचे ₹५.६२ लाख कोटी स्वाहा, सेन्सेक्सचा एकच शेअर ग्रीन झोनमध्ये; निफ्टीही आपटला
4
ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याला अपहरण करून बेदम मारलं; धारदार शस्त्राने बोटे छाटले, वाद काय?
5
ज्योत आणायला गेलेल्या भाविकांच्या गाडीचा अपघात; दोघे ठार, सहा जण गंभीर जखमी
6
इस्रायल-इराण युद्ध एकतर्फी होणार नाही; जाणून घ्या कुणाची लष्करी ताकद किती?
7
पुणे हेलिकॉप्टर अपघातील मृतांबाबत महत्त्वाची समोर; भारतासाठी दिलं होतं मोठं योगदान
8
संपादकीय: विधानसभेचा निकाल देशाच्या राजकारणाची दिशा बदलेल, त्यांच्या बोलण्याचा अर्थ...
9
भारतीय गाढ झोपेत असताना दिसले 'रिंग ऑफ फायर', वर्षातील शेवटच्या सूर्यग्रहणाचे अमेरिकेतून फोटो आले...
10
यूएनच्या सरचिटणिसांना इस्रायलमध्ये प्रवेशबंदी; इराणला योग्य वेळी प्रत्युत्तर देण्याची इस्रायलची धमकी
11
Share Market News : गुंतवणूकदारांना शेअर बाजार पावला, या वर्षी कमावले ११०.५७ लाख कोटी; जाणून घ्या
12
इराणच्या आण्विक स्थळांवर इस्त्रायली हल्ल्याला अमेरिका समर्थन देणार नाही, बायडेन यांनी केले स्पष्ट
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक व व्यावसायिक दृष्टिकोनांतून आजचा दिवस लाभदायी
14
उपचारासाठी आले अन् कॅबिनमध्ये केली डॉक्टरची हत्या; पोलिसांकडून दोघांचा शोध सुरु
15
बदलापूर बलात्कार प्रकरणात मोठी कारवाई, त्या शाळेच्या दोन फरार पदाधिकाऱ्यांना अखेर अटक
16
नवरात्री: ‘माझ्यासाठी जे काही चांगले आहे, ते मला अवश्य मिळेल’
17
मविआतील लहान घटक पक्षांना हव्यात ४० जागा; प्रस्तावावर ७ आणि ८ ऑक्टोबरला पुन्हा चर्चा
18
अजित पवार गटाला हव्यात महायुतीतील ६५ ते ६८ जागा; अमित शाह यांच्याकडे आग्रही मागणी
19
मुलगी जर दिसायला चांगली असेल तर... अजित पवार समर्थक आमदार देवेंद्र भुयार यांचे सभेत वादग्रस्त विधान
20
मुंबईकर सरफराझ खानचे ऐतिहासिक नाबाद द्विशतक

रत्नागिरी आगारात एसटीचा वर्धापनदिन साजरा

By मेहरून नाकाडे | Published: June 01, 2024 7:21 PM

एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ‘लालपरी’चे पूजनही करण्यात आले

रत्नागिरी : राज्य परिवहन महामंडळाच्या रत्नागिरी येथील आगारात एसटीचा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात आला. वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ प्रवासी रामचंद्र विठ्ठल मोगरे (८५, रा. खरवते, चिपळूण) यांच्या हस्ते श्रीफळ वाढविण्यात आला. तसेच रमेश मोहन पाटील यांच्या हस्ते केक कापण्यात आला.

एसटीच्या वर्धापनदिनानिमित्त ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ‘लालपरी’चे पूजनही करण्यात आले. रहाटाघर स्थानकात असलेल्या सर्व प्रवाशांना केक, पेढे व गुलाबपुष्प देण्यात आले. रहाटाघर बसस्थानकात वर्धापनदिनानिमित्त खास पताका लावून सुशोभीकरण करून रांगोळी काढण्यात आली होती.या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमासाठी विभाग नियंत्रक प्रज्ञेश बोरसे, विभागीय वाहतूक अधिकारी राकेश पवार, आगार व्यवस्थापक संदीप पाटील, स्थानकप्रमुख, विभागीय कार्यालय व रत्नागिरी आगारातील अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीBus Driverबसचालक