चिपळूण : तालुक्यातील टेरव वेतकोंड वाडी एसटी बसला अपघात झाल्याची घटना आज, मंगळवारी सकाळी घडली. या अपघातात दोन प्रवासी जखमी झाले आहेत.एसटी बसवरील ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या एका बाजूला जाऊन अडकली. यामध्ये दोन प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. या घटनेची माहिती मिळताच टेरव गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. यानंतर एसटी आगार व्यवस्थापक रणजित राजेशिर्के यांना अपघाताची माहिती देण्यात आली.दररोज सकाळी टेरव वेतकोंडवाडी येथे चिपळूण आगारातून बस सोडली जाते. या गाडीला विद्यार्थी व अन्य प्रवाशांची नेहमी गर्दी असते. तेव्हा सुस्थितीत असलेली एसटी बस द्यावी. अपघातग्रस्त एसटी बस अत्यंत वाईट व नादुरुस्त परिस्थितीत आहे. याबाबत मुखमंत्री एकनाथ शिंदे, आमदार शेखर निकम यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे किशोर कदम यांनी सांगितले.
चिपळूण: टेरव वेतकोंडवाडी येथे एसटी बसला अपघात, दोन प्रवासी जखमी
By संदीप बांद्रे | Published: August 09, 2022 11:18 AM