शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ₹1500 चे लवकरच ₹2100 होणार, मुख्यमंत्री शिंदेंची मोठी घोषणा!
3
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
4
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
5
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
6
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरल्या होत्या 363 महिला, किती जिंकल्या? असा राहिला महायुतीचा स्ट्राइक रेट
7
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
8
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
9
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
10
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
11
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
12
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
13
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
14
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
15
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
16
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
17
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
18
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
19
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान

बा देवा गणराया, विलीनीकरणाची जबाबदारी घे रे महाराजा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 08, 2022 6:52 PM

शासनास आणि प्रशासनास विलीनीकरणाची सद्बुद्धी दे रे महाराजा. या सर्वांची बडतर्फी, निलंबन, सेवासमाप्ती यापासून रक्षण कर.

अरुण आडिवरेकर

रत्नागिरी : ‘हे कष्टकरी एसटी कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने उभा राहा. या शासनास आणि प्रशासनास विलीनीकरणाची सद्बुद्धी दे रे महाराजा. या सर्वांची बडतर्फी, निलंबन, सेवासमाप्ती यापासून रक्षण कर. विलीनीकरणाची जबाबदारी घे, एसटी कर्मचाऱ्यांना सुखशांती आणि या गरीब जनतेची लालपरी वाचव रे महाराजा’,  असे गाऱ्हाणे घालत रत्नागिरीतील एसटी कर्मचाऱ्यांनी गणरायालाच साकडे घातले.एसटी महामंडळाचे शासनात विलीनीकरण हाेण्यासाठी एसटीच्या कर्मचाऱ्यांनी ८ नाेव्हेंबरपासून आंदाेलन सुरू केले आहे. या आंदाेलनात रत्नागिरी जिल्ह्यातील एसटी कर्मचारीही सहभागी झाले आहेत. महामंडळासह प्रशासनाने कर्मचाऱ्यांना कामावर हजर हाेण्याची विनंती केली आहे. या विनंतीनंतर काही कर्मचारी कामावर हजर झाले असून, काहीजण अजूनही विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम आहेत. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील एसटीची बससेवा अजूनही काेलमडलेलीच आहे.

विलीनीकरणाच्या मुद्द्यावर ठाम असलेल्या रत्नागिरी विभागातील कर्मचाऱ्यांनीच माघी गणेशाेत्सवाचे औचित्य साधत गणरायालाच साकडे घातले आहे. काेकण आणि गणेशाेत्सव हे एक समीकरणच आहे. गणरायाला घातलेले गाऱ्हाणे पावन हाेते अशी धारणा गणेशभक्तांची आहे. गणरायावरील श्रद्धेपाेटी साऱ्या कर्मचाऱ्यांनी गणरायाच्या मंदिरात एकत्र येत विलीनीकरण करण्यासाठी साकडे घातले.‘आई, बा गजानना’ अशी सुरुवात करत कर्मचाऱ्यांनी देवासमाेर आपली व्यथा मांडली. ‘एसटीचे कष्टकरी कर्मचारी शासनामध्ये विलीनीकरणासाठी दुखवटा पाळत आहेत. आज या विलीनीकरणासाठी ८८पेक्षा जास्त कर्मचारी शहीद झाले. त्यांच्या आत्म्याला शांती लाभावी, म्हणून हा दुखावटा आहे रे महाराजा.बा देवा महाराजा, विघ्नविनाशक गणराया, तू सुखकर्ता, दु:खहर्ता आहेस. तुझेच लेकरू डाॅ. बाबासाहेबांच्या संविधानावर विश्वास ठेवून हे एसटी कर्मचारी आणि छत्रपती शिवरायांचे मावळे दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने तू उभा राहा. जे दुखवट्यात आहेत, त्यांच्यासाेबत आणि जे साेडून गेले आहेत त्यांच्याशिवाय हे कष्टकरी एसटी कर्मचारी दुखवटा पाळत आहेत. त्यांच्या बाजूने उभा राहा,’ असे साकडे घातले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीST Strikeएसटी संप