शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

वारी लालपरीतून उलगडला एसटीचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2019 2:32 PM

राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीने मागील काही वर्षात अमुलाग्र बदल केले आहेत. एसटीने एक नवीन रुप परिधान केले आहे. या नव्या युगाच्या आधुनिक लालपरीच्या प्रगतीची गाथा सांगणारे ह्यवारी लालपरीचीह्ण हे अनोखे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रत्नागिरीत दाखल झाले असून, त्याचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे ३० बेडफर्ड बसेसपासून ते शिवशाहीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.

ठळक मुद्देवारी लालपरीतून उलगडला एसटीचा इतिहास३० बेडफर्ड बसेसपासून ते शिवशाहीपर्यंतचा प्रवास

रत्नागिरी : राज्याची लोकवाहिनी असलेल्या एसटीने मागील काही वर्षात अमुलाग्र बदल केले आहेत. एसटीने एक नवीन रुप परिधान केले आहे. या नव्या युगाच्या आधुनिक लालपरीच्या प्रगतीची गाथा सांगणारे ह्यवारी लालपरीचीह्ण हे अनोखे फिरते प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन रत्नागिरीत दाखल झाले असून, त्याचे उद्घाटन गुरूवारी करण्यात आले. या प्रदर्शनाद्वारे ३० बेडफर्ड बसेसपासून ते शिवशाहीपर्यंतचा प्रवास दाखविण्यात आला आहे.महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ आणि बस फॉर अस फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने वारी लालपरीची हे फिरते प्रदर्शन आयोजित केले आहे. रत्नागिरीतील रहाटागर येथील बसस्थानकात गुरुवारी कामगार अधिकारी प्रवीण पाटील, प्रभारी विभाग नियंत्रक सतीश बोगरे, यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी वाहतूक अधीक्षक सतीशकुमार खाडे, आगार व्यवस्थापक अजय मोरे, सहाय्यक वाहतूक अधिकारी अनंत जाधव, स्थानकप्रमुख तांदळे, आगार व्यवस्थापक सागर गाडे, वाहतूक नियंत्रक रमेश केळकर, वरिष्ठ लिपिक श्रीपाद कुशे उपस्थित होते.अहमदनगर-पुणे मार्गावर १ जून १९४८ रोजी पहिली बस धावली. लाकडी बॉडी असलेल्या ३०बेडफर्ड बसेस घेऊन महामंडळाचा प्रवास सुरु झाला. कालांतराने महामंडळाने अनेक बदल करत एसटीच्या सुविधा वाढविल्या. लाकडी ऐवजी आता अल्युमिनियम बॉडीच्या बस आल्या. कुशन असलेल्या सीट वापरण्यास सुरुवात झाली. १९५६पासून रातराणी सेवा सुरु करण्यात आली. निळ्या रंगाच्या बस आता लाल झाल्या आहेत. महामंडळात आज १५ हजारपेक्षा जास्त बसेस आहेत.ह्यवारी लालपरीचीह्ण उपक्रमात एसटी गाड्यांच्या बांधणीची माहिती मॉडेल आणि छायाचित्रांमधून देण्यात आली असल्याची माहिती फाऊंडेशनचे रोहित धेंडे यांनी दिली. रत्नागिरीतून हे फिरते प्रदर्शन २१ रोजी कणकवली आणि २२ रोजी मालवणमध्ये जाणार आहे.

टॅग्स :state transportएसटीRatnagiriरत्नागिरी