शहरं
Join us  
Trending Stories
1
TATA IPL Auction 2025 Live : कोण खाणार 'भाव', कोण उधळला जाणार डाव; मेगालिलावात ५७७ खेळाडूं रिंगणात
2
सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग, अजित पवारांची राष्ट्रवादीच्या गटनेतेपदी निवड
3
३३०० कोटींची संपत्ती… भाजपच्या सर्वात श्रीमंत उमेदवाराचा निकाल काय लागला?
4
विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची अवस्था फारच बिकट; 'या' दोन विजयांनी पक्षाला मिळाला दिलासा
5
IND vs AUS : टीम इंडियानं सेट केलं ५३४ धावांचं टार्गेट; मग ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के
6
'दैत्यांचा पराभव झाला...' कंगना राणौतची निकालावर प्रतिक्रिया; म्हणाली, "माझं घर तोडलं..."
7
Mahesh Sawant : "दोन बलाढ्यांसमोर टिकाव लागेल की नाही ही शंका होती, पण..."; महेश सावंतांनी स्पष्टच सांगितलं
8
वर्षभरानंतर किंग Virat Kohli च्या भात्यातून आली सेंच्युरी! सर Don Bradman यांना केलं ओव्हरटेक
9
जिथे BJP विरोधात थेट लढाई, तिथे काँग्रेसचे झाले पानिपत; 75 पैकी 65 जागा गमावल्या...
10
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 : 'लोकांना शंका, निवडणुकीला आव्हान दिलं पाहिजे'; असीम सरोदेंनी निकालावर व्यक्त केली शंका
11
"सगळीकडे नाही तर निवडक ठिकाणी EVM हॅक'; महाराष्ट्राच्या निकालावर काँग्रेस नेत्याचे विधान
12
IPL Auction 2025: लिलावात बड्या खेळाडूंवर लागणार 'जम्बो' बोली... पाहा, कोणाकडे किती पैसे शिल्लक?
13
Amol Mitkari : "अजित पवारांप्रमाणे सुप्रिया सुळेंनी औदार्य दाखवावं, अमोल कोल्हेंनी..."; मिटकरींचं टीकास्त्र
14
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights: अवघ्या १६२ मतांनी विजयी होऊन आमदार बनले; AIMIM पक्षानं त्यांची एकमेव जागा राखली
15
'अदानी-मणिपूर प्रकरणावर हिवाळी अधिवेशनात चर्चा व्हावी', काँग्रेसची सर्वपक्षीय बैठकीत मागणी
16
सरवणकर-अमित ठाकरे लढतीत महेश सावंत कशी बाजी मारून गेले? असं बदललं माहिमचं समीकरण
17
Narhari Zirwal : "उपाध्यक्ष पदाचा अनुभव घेतला, आता...."; नरहरी झिरवाळांनी सांगितलं 'मन की बात'
18
रोहित भाऊ ऑस्ट्रेलियात पोहचला; हिटमॅनची एन्ट्री टीम इंडियासह KL राहुलचं टेन्शन वाढणारी; कारण...
19
"बसपा कोणतीही पोटनिवडणूक लढवणार नाही", मायावतींची मोठी घोषणा; कारणही सांगितलं  
20
यशस्वी-KL राहुलच्या हिट शोनंतर कोहलीची फिफ्टी! टीम इंडियाची आघाडी ४०० पार...

मालगुंड येथे गाडीवर दगडफेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 01, 2017 1:25 PM

रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड येथील भूषण मयेकर यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गाडीची समोरील काच फुटली आहे. त्याचबरोबर याठिकाणी रात्री वस्तीला आलेल्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली आहे.

रत्नागिरी : तालुक्यातील मालगुंड येथील भूषण मयेकर यांच्या गाडीवर काल (शनिवारी) रात्री काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना समोर आली आहे. यामध्ये गाडीची समोरील काच फुटली आहे. त्याचबरोबर याठिकाणी रात्री वस्तीला आलेल्या एसटी बसवरही दगडफेक करण्यात आली आहे.

मालगुंड ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली असून, राजकीय द्वेषातूनच ही दगडफेक झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत अद्याप पोलीस स्थानकात कोणीही तक्रार दिली नसल्याची माहिती जयगड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक इंद्रजित काटकर यांनी सांगितले.मालगुंड ग्रामपंचायतीची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे राजकीय वातावरण हळूहळू तापू लागले आहे.

निवडणुकीसाठी परिवर्तन पॅनेलची स्थापना करण्यात आली असून, या पॅनेलच्या माध्यमातून निवडणूक लढविली जात आहे. शनिवारी रात्री येथीलच भूषण मयेकर यांच्या बोलेरो गाडीवर काही अज्ञातांनी दगडफेक केल्याची घटना घडली आहे.

या घटनेनंतर भूषण मयेकर यांच्या घराजवळून दोन दुचाकीस्वार धूमस्टाईने पळून गेल्याचे तेथील ग्रामस्थांनी सांगितले. या दगडफेकीमध्ये गाडीचे नुकसान झाले आहे. तर मालगुंड येथे वस्तीला आलेल्या गुहागर आगाराच्या बसवरही काहींनी दगडफेक केल्याचे सांगण्यात येत आहे.