वाटूळ : प्राथमिक शिक्षण घेत असताना इयत्ता चौथीपासून जुन्या नाण्यांचा संग्रह करण्याचा छंद गेली ४० वर्षे जोपासला आहे. या दुर्मीळ व जुन्या नाण्यांचा संग्रह वाढवणाऱ्या प्राध्यापक मधुकर तोडकर यांच्या या छंदाला लोकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.राजापूरच्या गोडे - दाते कला व वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक असणाऱ्या मधुकर तोडकर यांच्या संग्रहामध्ये शिवकालीन नाण्यांपासून अगदी पुरातन जुन्या नाण्यांचा तसेच देश विदेशातील चलनी नोटा व नाण्यांचा संग्रह आहे. तांबे, पितळ, अॅल्युमिनीयम, निकेल, जस्त, लोह आदी धातूंपासून तयार झालेल्या एक पैशाच्या नाण्यापासून १०० रुपयांच्या नाण्यांचा या संग्रहामध्ये समावेश आहे. नेपाळ, अरब, अमेरिका, फ्रेंच, कुवेत आदी देशांची नाणीदेखील या संग्रहामध्ये समाविष्ट आहेत. अनेक दुर्मीळ असलेल्या नोटा ज्यांच्या मोबदल्यात हजारो रुपये मिळतात, अशा ७८६ नंबरच्या नोटांचादेखील समावेश तोडकर यांनी केला आहे. राजापूर तालुका शिक्षक परिषदेच्या तालुका मेळाव्यामध्ये या संग्रहाचे नुकतेच प्रदर्शन भरविण्यात आले होते. भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. (वार्ताहर)संग्रहामध्ये शिवकालीन नाण्यांचादेखील समावेश.देश - विदेशातील चलनी नोटा व नाण्यांचा संग्रह.तांबे, पितळ, अॅल्युमिनीयम, निकेल, जस्त, लोह धांतूंच्या नाण्यांचाही समावेश.
प्राध्यापकाने जोपासला नाण्यांचा छंद
By admin | Published: April 01, 2016 1:41 AM