चिपळूण : चिपळूणातून मिरज येथे नियमित वैद्यकीय उपचारासाठी जाणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक आहे. त्यामुळे चिपळूण-मिरज अशी बससेवा सुरू करावी, अशी मागणी ॲड. ओवेस पेचकर यांनी येथील आगारप्रमुख रणजित राजेशिर्के यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
शहरातील गोवळकोट, गोवळकोट रोड, पेठमाप आणि कालुस्ते येथील रहिवासी आजारपणामुळे औषधोपचारासाठी मिरज येथे नियमित जात असतात. त्यामुळे गोवळकोट ते मिरज एसटी बससेवा (शिवनेरी) सुरू झाल्यास चांगले प्रवासी मिळतील. ही बस नियमितपणे सुरू राहील. येथील प्रवाशांनाही त्याचा दिलासा मिळेल. त्यामुळे चिपळूण आगारातून आरामदायी एस.टी. बससेवा (शिवनेरी बस) सुरू करण्यात यावी. ही बस सकाळी ६ वाजता सोडून परतीचा प्रवास सायंकाळी ७ वाजता असावा. आगाराच्या सोयीप्रमाणे ही बससेवा वन-स्टॉप किंवा नॉन-स्टॉप प्रवास अशी सुरू करावी, अशी मागणी केली आहे.
080721\1854-img-20210708-wa0019.jpg
चिपळूण- मिरज बस सेवा सुरू करावी