शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
2
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
3
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
4
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
5
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
6
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
8
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
9
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
10
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
11
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
12
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
13
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
14
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
15
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
16
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
17
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
18
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : प्रतिभा पवारांना बारामतीमधील टेक्सटाईल पार्कमध्ये अडवले; राजकीय चर्चांना उधाण
20
“भाजपा राजवटीत फक्त उद्योगपतीच सेफ, काँग्रेसने सर्व राज्यांचा विकास केला”: प्रियंका गांधी

मच्छीमारांनी न्याय मिळेपर्यंत लढ्यास तयार राहावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 09, 2018 2:40 AM

हर्णे बंदरातील मच्छीमार बांधव ज्याप्रमाणे नौका घेऊन समुद्रात गेले आणि त्यांनी एलईडी लाइट(एलईडी विद्युत प्रणाली)ने मच्छीमारी करणारी बोट पकडली त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली लढाई आपल्यालाच लढून जिंकायची आहे

बोर्ली मांडला : हर्णे बंदरातील मच्छीमार बांधव ज्याप्रमाणे नौका घेऊन समुद्रात गेले आणि त्यांनी एलईडी लाइट(एलईडी विद्युत प्रणाली)ने मच्छीमारी करणारी बोट पकडली त्याप्रमाणे आपल्याला सुद्धा आपली लढाई आपल्यालाच लढून जिंकायची आहे, असे प्रतिपादन अखिल भारतीय मच्छीमार खलाशी संघटनेचे अध्यक्ष विश्वनाथ म्हात्रे यांनी मुरुड तालुक्यातील नांदगाव कोळीवाडा येथे आयोजित एलईडी लाइट मच्छीमारी समस्येबाबत आयोजित सभेत केले.मच्छीमार बांधवांना सध्याच्या परिस्थितीत भेडसावणारी सर्वात मोठी समस्या आहे ती एलईडी लाइट मच्छीमारी. मच्छीमार बांधवांनी संघर्ष केला मात्र त्याची दखल ही लोकप्रतिनिधी किंवा अधिकारी यांनी आजपर्यंत घेतली नाही.फक्त आश्वासनाशिवाय काहीही दिले नाही.त्यामुळे आता कोणाच्याही पाठीशी न जाता आपण आपली लढाई लढण्यासाठी सज्ज होणे आवश्यक आहे. मस्यव्यवसाय विभागाचे जाधव नावाचे जॉइंट कमिशनर हे एलईडी लाइट मच्छीमारी आणि पर्सनेटने मच्छीमारी करणाऱ्या धनदांडग्यांना पाठीशी घालत आहे. समुद्रात बेकायदेशीररीत्या मच्छीमारी करीत असणारी बोट पकडून किंवा पकडली गेल्यास त्या बोटीकडून पाच पट दंड आकारला जातो. मात्र आतापर्यंत १३८ बोटी पकडल्या त्याचे काय झाले?असाही सवाल त्यांनी केला. लाकडी नौकांना पर्सनेटने मच्छीमारी करण्याची परवानगी आहे. मात्र फायबर बोटींना नाही. आता तर ९0 टक्के मच्छीमार हे फायबरची बोट वापरत असून त्यावर पर्सनेट वापरत आहेत. रामदास कदम हे मच्छीमार संघाच्या पाठीशी ठामपणे आहेत. मस्यव्यवसाय मंत्री हे कोकणातील नसल्याने त्यांना मच्छीमार बांधवांना उद्भवणारे प्रश्न काय समजणार? आता प्रत्येक गावातील वीस पंचवीस नौकांनी समुद्रात जाऊन एलईडी लाइटने मच्छीमारी करीत असलेली बोट पकडायची आणि त्यावरील खलाशी यांना आपल्या बोटीत घेऊन त्या बोटीवर असणारे एलईडी लाइट, जनरेटर आदी साहित्य समुद्रात नष्ट करायचे, असे विश्वनाथ म्हात्रे यांनी उपस्थित मच्छीमार बांधवांना सांगितले.>अधिवेशनात मच्छीमारांच्या बाजूने आवाज उठवामच्छीमार हा गेली अनेक वर्षे पिढ्यानपिढ्या समुद्रात मच्छीमारी करून उपजीविका करीत आहेत. मात्र गेल्या काही वर्षांपासून एलईडी लाइटने मासेमारी राजरोसपणे सुरू आहेत. या संदर्भात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस तथा विधानपरिषद आमदार जयंत पाटील यांना गेल्या अधिवेशनापूर्वी भेटून एलईडी लाइटने मासेमारी राजरोसपणे सुरू आहे त्यावर अधिवेशनात मच्छीमारांच्या बाजूने आवाज उठवा अशी विनंती केली.मात्र जयंत पाटील यांनी मच्छीमार बांधवांचा आवाज काही अधिवेशनात उचलला नाही. त्याचप्रमाणे अधिकारीही लक्ष देत नाही. हे सर्व पैसेवाल्यांना पाठीशी घालत आहेत, असे रायगड जिल्हा कोळी समाज संघाचे अध्यक्ष धर्मा घाबरट यांनी सांगितले. यावेळी व्यासपीठावर मनोहर बैले, मोतीराम पाटील, गोरखनाथ नवरीकर, ताराचंद कोंडे, महेंद्र गारडी, लहू रावजी आदी मान्यवर उपस्थित होते.