शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

शरीरसौष्ठवच्या बेकायदेशीर औषधांचा साठा जप्त, रत्नागिरीत एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2024 16:12 IST

दहशतवादविरोधी पथकाचा छापा

रत्नागिरी : शरीरसाैष्ठवच्या बेकायदेशीर इंजेक्शन व औषधांचा साठा केलेल्या घरावर छापा टाकून पाेलिसांनी ३,७२८ रुपये किमतीची इंजेक्शन्स व औषधे जप्त केली आहेत. ही कारवाई रत्नागिरीतील दहशतवादविराेधी शाखेच्या पथकाने शुक्रवारी सायंकाळी मिरजाेळे येथे केली असून, औषधांचा बेकायदेशीर साठा करणाऱ्या साईराज रमेश भाटकर (२६, रा. एमआयडीसी - मिरजाेळे, रत्नागिरी) याला अटक केली आहे.शरीराचे सौष्ठव वाढावे, यासाठी उपयुक्त असल्याचे सांगून शरीराला घातक ठरणाऱ्या वेगवेगळ्या कंपन्यांची इंजेक्शन्स् व औषध बेकायदेशीरपणे बाळगून त्याची विक्री होत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे रत्नागिरी शहरानजीकच्या मिरजाेळे येथील एमआयडीसी परिसरातील साईराज भाटकर याच्या घरावर पाेलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ७:४५ वाजण्याच्या दरम्यान छापा टाकला. या छाप्यामध्ये पाेलिसांना इंजेक्शन व औषधांचा बेकायदेशीर साठा आढळला.

ही औषधे खरेदी व विक्रीसाठी ड्रग्ज आणि काॅस्मेटिक ॲक्ट १९४० अंतर्गत परवाना आवश्यक आहे. मात्र, असा काेणताही परवाना साईराज भाटकर याच्याकडे नसल्याचे पाेलिस तपासात पुढे आले. तसेच ही औषधे केवळ डाॅक्टरच्या प्रिस्क्रीप्शनद्वारेच विक्री करणे बंधनकारक आहे. विक्रीचा काेणताही परवाना नसताना, औषध विक्री करण्याचे काेणतेही शिक्षण घेतलेले नसताना त्याची विक्री करत असल्याचे पुढे आले आहे.पाेलिसांनी सर्व इंजेक्शन व औषधांचा साठा जप्त केला असून, त्याची किंमत ३,७२८.४० रुपये इतकी आहे. याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम २७५, २७८, १२३, १२५ अन्वये गुन्हा दाखल करून साईराज भाटकर याला अटक केली आहे.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीbodybuildingशरीरसौष्ठवmedicineऔषधं