रत्नागिरी : तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्ग्यापासून ८० तर पूर्व सोलापूरपासून १६० किलोमीटर अंतरावर जमिनीवर असून, पुढील १२तासांत या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे १६ ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.गेल्या दोन दिवसांपासून सर्वच जिल्ह्यांत मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे अनेक भागात ढगफुटी, विजांचा कडकडाट व जोरदार वारे यामुळे मोठे नुकसान होत आहे. धुमाकूळ घालणारा हा पाऊस १८ऑक्टोबरपर्यंत कायम राहणार असून, त्यानंतरच मान्सूनचा परतीचा प्रवास सुरू होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.मध्यपूर्व अरबी समुद्र, उत्तर पूर्व अरबी समुद्र, महाराष्ट्राची किनारपट्टी पार करून दक्षिण गुजरातकडे जाणार आहे. असे असले तरी राज्यात तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यामुळे १८ ऑक्टोबरपर्यंत पाऊस कायम राहणार आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागात १५ व १६ ऑक्टोबरपर्यंत ह्यरेड अलर्टह्ण, रायगड, कोल्हापूर, सातारा, ठाणे, मुंबई या भागात १५ते १७ ऑक्टोबरपर्यंत ह्यऑरेंज अर्लटह्ण देण्यात आला आहे.
कोकण किनारपट्टीवर धडकणार वादळ, रत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 2:53 PM
ratnagiri, konkancosat, Storm, तीव्र कमी दाबाचा पट्टा उत्तर कर्नाटकपासून महाराष्ट्रापर्यंत आहे. हा पट्टा गुलबर्ग्यापासून ८० तर पूर्व सोलापूरपासून १६० किलोमीटर अंतरावर जमिनीवर असून, पुढील १२तासांत या पट्ट्याची तीव्रता कमी होऊन तो मध्यपूर्व अरबी समुद्र, मध्य महाराष्ट्राच्या किनारपट्टीकडे १६ ऑक्टोबरपर्यंत सरकणार आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
ठळक मुद्देकोकण किनारपट्टीवर धडकणार वादळरत्नागिरी जिल्ह्याला रेड अलर्ट